बांद्रा टर्मिनस ते मडगाव रेल्वेला खेडमध्ये थांबा न दिल्यास मनसेतर्फे रेल रोको करण्याचा इशारा!

Vaibhav Khedkar

महाड ( मिलिंद माने ) :

गणेशोत्सव काळासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने बांद्रा टर्मिनस ते मडगाव१०११५ ही नवीन गाडी चालू केली आहे मात्र कोकणातील खेड रेल्वे स्थानकाला थांबा न दिल्याने गणेशोत्सव काळात प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी या गाडीला खेड रेल्वे स्थानकात थांबा द्यावा अन्यथा मनसे तर्फे रेल रोको करण्याचा इशारा मनसेचे कोकणचे नेते व सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
गणेशोत्सव काळासाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई उपनगरातील कोकणात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी बांद्रा टर्मिनस ते मडगाव १०११५. ही नवीन गाडी गणेशोत्सव काळासाठी चालू केली आहे या गाडीमुळे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांना याचा फायदा होणार असला तरी मुंबईतील बोरिवली वसई दिवा त्यानंतर पनवेल पर्यंत या गाडीला थांबा देण्यात आला आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील तीन ठिकाणी या गाडीला थांबा आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व रत्नागिरी या दोन रेल्वे स्थानकांना थांबे दिले आहेत त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन ठिकाणी थांबे दिले आहेत मात्र कोकणातील खेड हे जंक्शन स्टेशन असताना देखील या बांद्रा मडगाव एक्सप्रेस ला थांबा न दिल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हे जंक्शन स्टेशन असताना वंदे भारत सारखी एक्सप्रेस या ठिकाणी थांबते मात्र बांद्रा मडगाव या एक्सप्रेसला थांबा न दिल्याने खेड तालुक्यातील दापोली व मंडणगड या ठिकाणी मुंबई उपनगरातून जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना त्याचा फटका बसणार आहे. तरी प्रवाशांचे हित लक्षात घेता या बांद्रा मडगाव या एक्सप्रेसला खेड स्थानकामध्ये थांबा द्यावा अन्यथा मनसेतर्फे रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे कोकणचे नेते व सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading