बदलापूर येथील लहान बालिकेवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या नराधमावर पोलिसांनी एन्काऊंटर करुन कठोर कारवाई केली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या एन्काऊंटरमुळे पिडितेला न्याय मिळाल्याची भावना संपूर्ण देशभरातून व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या घटनेचा आनंद शहरभर फटाके वाजवून, साखर वाटून व्यक्त करण्यात आला.
शर्मिलाताई ठाकरे यांनी या धाडसी कारवाईत सहभागी पोलिसांचे अभिनंदन करत प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आणि त्यांना भेटून गौरवले. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष संजय आखाडे, तालुकाध्यक्ष निलेश बामणे, शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, महिला सेना तालुका अध्यक्ष राजश्री पाटणे, मीनलताई गांधी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष पुष्पेन दिवटे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.