भारतीय पोर्ट अँड डाक मजदूर महासंघाची राष्ट्रीय कार्यकारिणी ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई पोर्ट येथे पोर्ट मध्ये संपन्न झाली. या मिटिंग मध्ये देशातील सर्व बंदरातील पदाधिकारी उपस्थित होते. बंदरातील वेतन करार लवकरात लवकर करा असा ठराव पास करण्यात आला. तशा प्रकारचे पत्र सर्व पोर्टचे चेअरमन आणि मंत्री महोदयांना दिलेला आहे.
यामध्ये भारतीय मजदूर संघाला ७० वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने सर्व बंदरामध्ये संपर्क अभियान चालू आहे. संपर्क अभियानाची जोरदार उपक्रम सुरु आहेत. सदर मिटिंग मध्ये अनेक विषय घेण्यात आलेले आहेत. या मध्ये पोर्टचे राहिलेले विषय ताबडतोब पत्रव्यवहार करून त्याची अंमलबजावणी करावी असा ठराव झाला. १० बंदरातील कामगार प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत रॉय, महामंत्री सुरेश पाटील, केंद्रीय नेते व महासंघाचे प्रभारी अण्णा धुमाळ, सह प्रभारी व्ही एम चावडा, कोषाध्यक्ष सुधीर घरत, विश्वस्त रवि पाटील, के. के. विजयन, विघ्नेश नाईक, समीर मुजुमदार, संजय धंदाळ, प्रभाकर उपरकर, स्नेहल मोरे, श्रेया शेळके, तीवरेकर असे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रसंगी वेतन करार समितीचे सदस्य सुरेश पाटील यांचा वेतन करार घडवून आणल्या बद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
संपर्क अभियानच्या माध्यमातून नागरिकांचे कर्तव्य, पर्यावरण संरक्षण संवर्धन, एकता, समता, बंधुता आदी मूल्यांचे जनजागृती करून ती तळागाळात पोहोचविण्याचे काम सुरु असल्याचे महामंत्री सुरेश पाटील यांनी माहिती दिली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.