PEN न्यूज ऑनलाइन टीम :
बँक ऑफ महाराष्ट्रने विविध स्केल II, III, IV, V, VI, आणि VII अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तुमचीही या पदांशी संबंधित पात्रता असल्यास, तुम्ही bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता.
या भरतीतून एकूण १७२ पदे भरायची आहेत. यामध्ये जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि मॅनेजर या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी आहे. उमेदवारांनी बँकेच्या वेबसाइटला भेट देऊन तपशीलवार सूचना वाचा आणि अर्जाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.
पात्रता :
शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीसह किमान बीटेक किंवा बीई पूर्ण केलेले असावे.
वयोमर्यादा:
पदावर अवलंबून उमेदवारांचे वय २२ ते ५५ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाते. “पात्रता निकष (वय, पात्रता, कामाचा अनुभव) आणि इतर तपशीलांसाठी कट-ऑफ तारीख ३१.१२.२०२४ आहे,” अधिकृत सूचना सांगते.
अर्ज शुल्क :
सामान्य/EWS/OBC श्रेणींसाठी अर्ज शुल्क – रु ११८० (18% GST सह)
SC/ST/PwBD श्रेणींसाठी अर्ज शुल्क – रु ११८ (18% GST सह)
निवड प्रक्रिया :
या पदांसाठी उमेदवारांची अंतिम निवड मुलाखतीत मिळालेल्या गुणांवर आधारित असेल. एकूण १०० गुणांपैकी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांनी किमान ५० गुण आणि SC/ST/PWD उमेदवारांनी किमान ४५ गुण प्राप्त केले पाहिजेत.
असा करा अर्ज :
-
अधिकृत वेबसाइटला भेट द्या (https://bankofmaharashtra.in/)
-
भर्ती लिंकवर क्लिक करा आणि स्वतःची नोंदणी करा
-
अर्ज भरा
-
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा
-
फॉर्म सबमिट करा.