PEN न्यूज ऑनलाइन टीम :
यकृत हे शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपैकी एक असून, अन्न पचन, विषारी घटक काढणे, हार्मोन नियंत्रण आणि पोषक द्रव्ये साठवण्याचे कार्य करते. मात्र, फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे मधुमेह, हृदयविकार आणि यकृताचे नुकसान होऊ शकते. जास्त वजन, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, मद्यपान किंवा कौटुंबिक इतिहासामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते.
फॅटी लिव्हरमुळे यकृताच्या पेशींभोवती फॅट जमा होतो आणि त्याची प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे स्टीटोहेपेटायटीस, फायब्रोसिस, सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोग होऊ शकतो. असे बंगळुरूच्या ॲस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या एचपीबी आणि प्रत्यारोपण फिजिशियन विभागाच्या सल्लागार डॉ. मल्लिकार्जुन सकपाळ यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
टीप : वरील सर्व बाबी PEN न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून PEN न्यूजचा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत