फिरते निगराणी आणि स्थिर देखरेख पथकाकडून कोटींची रोकड हस्तगत

Rupaye 500
 पनवेल ( संजय कदम ) :
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नियुक्त करण्यात आलेल्या फिरते निगराणी आणि स्थिर देखरेख पथकाने गेल्या 15 दिवसांमध्ये बेकायदेशीररित्या रक्कम नेली जाणारी 3 वाहने पकडून त्यातून तब्बल 1 कोटी 14 लाख 57 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. त्याशिवाय नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाची तस्करी करणारे, बेकायदा मद्य बाळगणारे आणि विकणारे, तसेच बेकायदा शस्त्र बाळगणार्‍या आणि त्याची विक्री करणार्‍यांवर देखील धडक कारवाई केली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि उरण या 4 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सदर 4 विधानसभा क्षेत्रात निवडणुकीच्या कालावधीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘निवडणूक आयोग’कडून लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत फिरते निगराणी पथक (एफएसटी) तसेच स्थिर देखरेख पथक (एसएसटी) नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकाच्या माध्यमातुन बेकायदेशीरपणे नेली जाणारी मोठी रोकड, अंमली पदार्थ, अवैध मद्यसाठा आणि मद्याची वाहतूक करणार्‍यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. 15 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत फिरते आणि स्थिर देखरेख पथकाने 3 वेगवेगळ्या कारवायांमध्ये रोख रक्कम घेऊन जाणारी 3 वाहने पकडून त्यातून 1 कोटी 14 लाख 57 हजाराची रक्कम पकडली आहे.
सदरची रोख रक्कम कोषागारात जमा करण्यात आली असून या रोख रक्कमेबाबत आयकर विभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading