पनवेल ( संजय कदम ) : काम करत असताना डोक्यात फरशी पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कळंबोली येथील मार्बल मार्केट मध्ये घडली आहे.
कळंबोली येथील मार्बल मार्केटमध्ये काम करीत असताना परशुराम पासवान या कामगाराच्या डोक्यावर फरशी पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता अखेर उपचारदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे काम करताना कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ही घटना कळताच कळंबोली मार्बल मार्केटमधील कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आणि सुरक्षा साधने आणि सोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.