खांदेश्वर पोलिसांनी अवघ्या 24 तासात जबरी चोरी उघडकीस आणून आरोपीला अटक केली आहे.
यातील फिर्यादी या नारळ पाणी घेण्यासाठी पायी जात असताना रोड नंबर एक भगत शेठ यांचे घराजवळ सेक्टर 12 नवीन पनवेल या ठिकाणी अटक आरोपी आकाश गोपाळ गाडे (22) याने फिर्यादी यांचे पाठीमागून जाऊन फिर्यादीस तोंडावर दगडाने इच्छापूर्वक दुखापत करून फिर्यादी यांचे गळ्यातील 35 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अंदाजे किंमत 83 हजार ही जबरीने खेचून चोरून नेली होती.
याबाबतची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप बंडगर, पो.हवा. महेश कांबळे, भाऊराव बाचकर, धीरेंद्र पाटील, पो.शि. सचिन सरगर आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे आरोपीला अवघ्या 24 तासात अटक केली आहे. त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.