PEN न्यूज ऑनलाइन टीम :
प्रोटीन मिळवण्यासाठी पेरू हे सर्वोत्तम फळ मानले जाते. प्रति १०० ग्रॅम पेरूमध्ये अंदाजे २.६ ते ३ ग्रॅम प्रोटीन असते. याशिवाय, फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दररोज १५०-२०० ग्रॅम पेरू खाल्ल्याने शरीरास ४-६ ग्रॅम प्रोटीन मिळू शकते.
टरबूज हे कमी प्रोटीनयुक्त फळ असले तरी त्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे. प्रति १०० ग्रॅम टरबूजमध्ये फक्त ०.६ ग्रॅम प्रोटीन असते. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. उन्हाळ्यात आणि व्यायामानंतर टरबूज खाल्ल्याने डिहायड्रेशन दूर होते.
फक्त फळांमधून शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत नाही. त्यामुळे आहारात दही, कडधान्य, शेंगदाणे आणि काजूसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. अशा संतुलित आहाराने स्नायू बळकट होतात, चयापचय सुधारते आणि एकूणच आरोग्य टिकून राहते.
(टीप – येथे दिलेली माहिती गृहितकांवर आधारित आहे. PEN न्यूज या माहितीचं समर्थन करत नाही. )