प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील 1000 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन; जाणून घ्या उपलब्ध कोर्सेस आणि जिल्ह्यातील सहभागी महाविद्यालये
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील 1000 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन; जाणून घ्या उपलब्ध कोर्सेस आणि जिल्ह्यातील सहभागी महाविद्यालये
महाराष्ट्र राज्यातील एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन २० सप्टेंबर २०२४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील १२ महाविद्यालयांचा या केंद्रांत समावेश आहे. या कौशल्य विकास केंद्रांचे मुख्य उद्दिष्ट युवक आणि युवतींना रोजगारक्षम बनविणे आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० अंतर्गत व्यावसायिक शिक्षणाला अधिक महत्त्व देण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजना सुरू केली आहे. या योजनेमधून १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
*रायगड जिल्ह्यातील समाविष्ट महाविद्यालये आणि कौशल्य प्रशिक्षण कोर्सेस:*
रायगड जिल्ह्यातील १२ महाविद्यालयांत ८ क्षेत्रांतर्गत १६ जॉब रोल्स (कोर्सेस) उपलब्ध आहेत. हे कोर्सेस रोजगारक्षम कौशल्यांचे प्रशिक्षण देतील, ज्यात खालील कोर्सेसचा समावेश आहे:
1. *Gardener cum Nursery Raiser* 2. *Vermicompost Producer* 3. *Fishing Boat Maintenance Worker* 4. *AI & Data Scientist* 5. *Media Developer* 6. *Guest Service Executive (Front Office)* 7. *Front Office Assistant* 8. *Front Office Manager* 9. *Accounts Assistant* 10. *Jr. Technician (Smart Energy Meter)* 11. *Graphic Designer* 12. *Drone Manufacturing and Assembly Technician* 13. *Solar Panel Installation Technician* 14. *Multi Skill Technician (Household and Small Establishment)*
*महाविद्यालयांची यादी:*
1. Dr. Babasaheb Ambedkar College of Arts, Commerce and Science 2. Smt. Geeta D. Tatkare Polytechnic 3. S.E.S’s, Shikshan Maharshi Dadasaheb Limaye Arts, Commerce & Science College, Kalamboli 4. Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere 5. Sheth J.N. Paliwala Commerce College, Science and Art College Pali-Sudhagad 6. Anjuman-I-Islam’s Kalsekar Technical Campus 7. Yadavrao Tasgaonkar Polytechnic 8. Yadavrao Tasgaonkar Institute of Engineering & Technology 9. Anjuman-I-Islam’s Kalsekar Technical Campus School of Engineering and Technology 10. Asha Marine Technical College & Research 11. Abhinav Jnyan Mandir Arts, Science & Commerce College 12. Pillai College of Arts, Commerce & Science (Autonomous)
या केंद्रांमधून उमेदवारांना मोफत कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल, जे त्यांना रोजगार मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.