पोस्को कंपनीत पत्रकार व शेतकऱ्यांशी पिप ॲग्रोचे संचालक बोबडे यांनी साधला सुसंवाद

पोस्को कंपनीत पत्रकार व शेतकऱ्यांशी पिप ॲग्रोचे संचालक बोबडे यांनी साधला सुसंवाद
माणगांव (रविंद्र कुवेसकर) : 
बुधवार दिनांक १९ मार्च २०२५ रोजी पोस्को महाराष्ट्र स्टील मल्टिनॅशनल कंपनीत त्रैमासिक पत्रकार व शेतकरी संवाद कार्यक्रम आज पुनः एक नवीन विषय अनुभव देवून गेला. कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत गेली वर्षभर पासून शेतकरी मार्गदर्शन, शेतीमधील कौशल्य व उद्योजगता विकास अश्या आशयाचे हे उद्बोधन सत्र पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वू सुक चॉई व संचालक जी युन पार्क व व्यवस्थापन विभाग प्रमुख महेंद्र तट्टे, वक्ते संतोष बोबडे व स्वप्नाली शेपोंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. चॉई यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना पोस्को कंपनी यथायोग्य सामाजिक उपक्रमांत गुंतवणूक करीत आहेच मात्र व्यवसाय अधिक स्थिर झाल्यास अजून बऱ्याच गोष्टी करायचा मानस त्यांनी बोलून दाखविला. कंपनीच्या सामाजिक उपक्रमांची अद्ययावत माहिती स्वप्निल पाटील यांनी दिली व कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलदीप पुरंदरे यांनी केले.
वक्ते संतोष बोबडे हे सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर (Social Media Influencer) व ॲग्रोप्रिनियर (Agropreneur) असून पिप ॲग्रो (PIP Agro) नामक प्रोप्रायटरशिप (proprietorship) उद्योगाचे संस्थापक संचालक आहेत. २०१७ पासून शेती व शेती निगडीत व्यवसाय करण्याची मानसिकता ठेवून काही ठिकाणी प्रत्यक्ष अनुभव घेऊन पिप(PIP) ची सुरुवात केली व आज काही कोटींचा टर्न ओव्हर व्हीव्हीआयपी क्लायंट्स (Turnover, VVIP Clients )अशी मजल गाठली आहे. या व्यवसायाचे यश हे गुणवत्ता व सातत्य तसेच सोने स्वरूपाने खाद्यान्न विकतो हे आहे.
अन्न हे सर्व व्याधीं वरील औषध आहे आणि तेच सध्या दुर्लक्षित असे क्षेत्र आहे, ज्याला कोणाला कदाचित काही येत नाही तो शेती करतो ही मानसिकता आहे पण खरं तर शेती ही अत्यंत निष्णात कला आहे. जी सतत अभ्यास करायला लागणारी हवा, माती, पाणी, पाऊस, ऊन, हिवाळा, पावसाळा, ऋतुचक्र, बी-बियाणे या सर्वांचा सतत अभ्यास ज्याला झेपेल तोच शेतीत टिकू शकतो असे आहे. सगळे सण उत्सव हे निसर्ग व शेती पूरक, आधारित आखले गेलेत व त्या प्रत्येकाचा शास्त्रीय आधार आहे. तो जाणून घेतला पाहिजे, ज्या करिता वाचन, भेटी गरजेच्या आहेत.
शेती एकट्याचे काम नसून शेती संबंधित कामांची योग्य विभागणी केल्यास शेती कधीही नुकसान करीत नाही. मात्र योग्य काम योग्य व्यक्तीला देणे गरजेचे आहे. मार्केटिंग ही अशीच एक गोष्ट आहे जी नीटपणाने शिकली गेली पाहिजे व यासाठी गुणवत्ता राखली तर हे सहज शक्य आहे. आपल्या शेती उत्पन्नाची विशेषता: काय असू शकेल ती सुद्धा स्थानिक ओळख निर्माण करू शकेल अशी शक्यता तपासून पाहिली पाहिजे.
आपला ब्रँड तयार व्हायला वेळ लागेल पण त्यासाठी सचोटीचे प्रयत्न आवश्यक आहेत, पैसे चांगले मिळवणे गैर नाही मात्र शेतीतून आपले स्वास्थ्य नीट राहते हेही तितकेच महत्वाचे आहे. आपल्या ताटात येणारे अन्न अधिकाधिक शुद्ध स्वरूपाचे यावे ज्यातून आपले आरोग्य उत्तम राहील यासाठी पुढील काळात संगळ्यांनीच शेती करणे गरजेचे आहे.
सध्याची ओघवती संकटे व त्यांचा सामना करण्याकरिता जसे वातावरण बदल ज्यामुळे अनिश्चित शेती उत्पादन, अतिरिक्त शेती उत्पादन प्रक्रिया, नविन्नता, माणसांना भेडसावणाऱ्या अनेक व्याधी अश्या स्थितीत शेतीत साधायची शाश्वतता हे सगळे पाहता शेती करिता अभ्यास, नवनवीन कला गुण शिकणे उदा. सोशल मिडियाचा वापर, मल्टी क्राॅपिंग, साॅईल कार्बन (multi cropping, soil carbon) चे प्रमाण, शेती माल-प्रक्रिया असे विषय समजून घेऊन त्यावर एकत्रित काम करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.
संतोष हे तरुण पिढीतील शेतकरी व ॲग्रोप्रिनियर (Agropreneur) असल्याने ज्वलंत यशस्वी उदाहरण समोर उभे राहिल्यास अधिक गोष्टी न बोलता शिकवून जातात, असा प्रत्यय अनेक शेतकरी व पत्रकार यांचेशी बोलताना जाणवला व असे उद्बोधन सत्र करत राहिले पाहिजे असेही मनोगत पोस्को अधिकाऱ्यांकडे अनेकांनी व्यक्त केले. आभार व पसायदान म्हणून या कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading