न्हावा शेवा पोलीस ठाणे हद्दीतील तुकाराम हरी वाजेकर येथे उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी/विद्यार्थिनी व शिक्षकांना यांना मानवी हक्क दिन निमित्त समाजातील तळागाळातील जनतेला मानवी हक्काचे ज्ञान माहिती होणे व त्याबाबत जनजागृती करिता पोलीस प्रशासनातर्फे कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर वेळी म.स.पो.नी मोनाली चौधरी. (गुन्हे), म.पो.उप निरी. अश्विनी कांबळे यांनी मानवी हक्का बाबत माहिती दिली.
मानवाचे हक्क, पोलीस दलाची माहिती त्याचप्रमाणे सायबर सुरक्षा व गुन्हे प्रतिबंध,व्यसन मुक्ती व अंमली पदार्थ प्रतिबंध, आर्थिक फसवणूक व प्रतिबंधक उपाय,जेष्ठ नागरिक सुरक्षा व काळजी, मुली, महिला व बालकाची सुरक्षा, महिलांच्या विरोधातील घटना आदी संदर्भात पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच नवी मुंबई पोलीस व्हॉट्सअप चॅनेले फॉलो करण्यास सांगितले व नागरिकांचे पोलिस मदतीसाठी डायल ११२ व साइबर फ्रॉड हेल्पलाईन १९३० क्रमांकाची माहिती देऊन त्याचा प्रसार नागरिकामध्ये करावा. यांसारख्या विषयांवर पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
सदर वेळी मनोहर म्हात्रे (प्राचार्य ), वैजनाथ कुटे. (ज्यु कॉलेज प्रमुख ), दर्शना माळी (उप शिक्षिका ) तसेच ७० ते ८० विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.