पोलिस अधिकार्‍यांच्या पदोन्नती जाहीर ! अधिकराव पोळ मुंबईच्या सहायक पोलीस आयुक्तपदी, शिवाजी ज्ञानदेव फडतरे पेण विभागीय पोलीस अधिकारीपदी

police
पनवेल  ( संजय कदम ) : महाराष्ट्र दहशदवादविरोधी पथक, नवी मुंबई (एटीएस) येथे कार्यरत असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव महादेव पोळ यांची मुंबईच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी तसेच नवी मुंबई कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे वाचक पोलीस उप अधीक्षक शिवाजी ज्ञानदेव फडतरे यांची पेण विभागीय पोलीस अधिकारीपदी पदोन्नती जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील १४३ पोलीस निरीक्षकांची पोलीस उप अधीक्षक/ सहा. पोलीस आयुक्त (नि:शस्त्र ) या संवर्गातील पदावर पदोन्नती जाहीर केल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेने आणि पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीने पोलीस अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेने तात्पुरती पदोन्नती देण्यात येत असल्याचे गृह विभागाने आदेश काढले आहेत.
यात पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत मान्यता देण्यात येत असल्याचेही राज्याच्या गृह विभागाने आदेश काढले आहेत.
यामध्ये महाराष्ट्र दहशदवादीविरोधी पथक, नवी मुंबई (एटीएस) येथे कार्यरत असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव महादेव पोळ यांची मुंबईच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी तसेच खान्देश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष दत्तात्रय कोकाटे यांची खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारीपदी पदोन्नती जाहीर करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शिवदास शुक्ला यांची मुंबई सहायक पोलीस आयुक्तपदी,
पनवेल महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उप अधीक्षक संदीप वसंत भागडीकर यांची सुद्धा मुंबईच्या सहायक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती करण्यात आली आहे.
तसेच नवी मुंबई कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे वाचक पोलीस उप अधीक्षक शिवाजी ज्ञानदेव फडतरे यांची पेण विभागीय पोलीस अधिकारीपदी बदली  झाली आहे.
प्रदीप गिरीजनाथ तिदार यांची नवी मुंबई डायल ११२ पोलीस उप अधीक्षकपदी पदोन्नती करून बदली जाहीर झाली आहे.
पदोन्न्ती झालेल्या अधिकाऱ्यांचे सहकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading