पोलादपूर: सभापती आणि सदस्य निवडीवर नगरसेवकांचा बहिष्कार

पोलादपूर: सभापती आणि सदस्य निवडीवर नगरसेवकांचा बहिष्कार
पोलादपूर (शैलेश पालकर) :
नगरपंचायत पोलादपूरच्या विषय समिती सभापती व सदस्य निवडीवर विरोधी गटनेते दिलीप भागवत आणि नगरसेवकांनी बहिष्कार टाकला आहे. गेल्या वर्षभरामध्ये विषय समिती सभापती व सदस्यांची एकही एकत्रित सभा आयोजित न झाल्याने विरोधी गटाकडून कोणत्याही सदस्याचे नांव या विषय समित्यांसाठी सुचविण्यास पिठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.ज्ञानोबा बाणापुरे यांना एका निवेदनाद्वारे नकार देण्यात आला.
पोलादपूर नगरपंचायतीच्या स्थापनेपासून नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी व आवश्यक कर्मचारी वर्ग न मिळाल्याने तसेच सत्ताधारी व विरोधी गटांमध्ये संघर्ष व एकवाक्यतेची अनाकलनीय भुमिका दिसून आल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोलादपूरकर नागरिकांच्या घरपट्टीवाढीविरोधात जनरल बॉडीच्या सभाच न झाल्यामुळे सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांकडून कोणताही ठराव करण्यात आला नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जनतेच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्याऐवजी वाढ करून लोकहिताला बाधा आणल्याचा जनक्षोभ घरपट्टीवाढी विरोधातील जनभुमिकेवेळी व्यक्त झाला होता.
नगरपंचायतीच्या या अनागोंदी कारभारावर विरोधी गटनेता दिलीप भागवत यांनीच वाचा फोडली असून नगरसेवक स्वप्नील भुवड तसेच श्रावणी मिलींद शहा, आशा सचिन गायकवाड आणि तेजश्री अभिषेक गरुड या नगरसेविकांनी समित्यांचे सभापती आणि सदस्यांची निवड हा फार्स असून दि. 30 जानेवारी 2025 रोजीची निवडदेखील खोटा देखावा असल्याने विरोधी गटाच्या नेता व नगरसेवकांनी विरोधी गटाकडून कोणत्याही सदस्याचे नांव या विषय समित्यांसाठी सुचविण्यास पिठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.ज्ञानोबा बाणापुरे यांना एक निवेदन देऊन नकार देण्यात आला आहे. परिणामी, 2025-26च्या  विषय समिती सभापती व सदस्य निवडीवेळी फक्त सत्ताधारी नगरसेवकांची वर्णी लावून एकतर्फी कारभार होण्याची शक्यता असून यामुळे दिवसेंदिवस पोलादपूरमधील लोकशाही भंगाराच्या भावात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading