शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या विजयी चौकारासाठी महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी पोलादपूर आणि मुंबईमध्ये केलेल्या दौऱ्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचाही पक्षप्रवेश घेतला.
पोलादपूर शहरात मनसेला खिंडार
महाड विधानसभा मतदारसंघ पोलादपूर शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदेश सुतार, किरण जगताप, सुरज जगताप, सौरभ जगताप, प्रसाद पवार, संकेत जगताप, सिध्देश जगताप, अक्षय शिवदे इत्यादी तरुण युवकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेश समारंभावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासमवेत शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहर प्रमुख सुरेश पवार, नगरसेवक सिध्देश शेठ, प्रकाश अण्णा गायकवाड, सुशांत जगताप इत्यादी शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मोरगिरी दळवीवाडीतील शिवसेना उबाठा पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत
पोलादपूर तालुका मोरगिरी दळवीवाडीतील प्रकाश दळवी, भारती दळवी, निलेश दळवी, स्वाती दळवी, गणेश दळवी, अमित दळवी इत्यादींनी आ. भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेश समारंभावेळी आ. भरत गोगावले यांच्यासमवेत जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, पोलादपूर तालुकाप्रमुख निलेश अहिरे, विभाग प्रमुख सतीश शिंदे, कोतवाल विभाग महिला संघटिका गीता दळवी, उप संघटिका चेतना पवार तसेच तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
ओंबळी दत्तवाडीतील चाकरमान्यांचा बाळासाहेब भवनमध्ये शिवसेनेत प्रवेश
पोलादपूर तालुका ओंबळी दत्तवाडी येथील मुंबईकर चाकरमानी यांनी मुंबई येथील बाळासाहेब भवन या ठिकाणी आमदार भरत शेठ गोगावले, यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. अनेक वर्ष ज्या पक्ष सोबत राहिलो त्या पक्षाने कोणत्याही प्रकारची विकास कामे केली नाही, फक्त जनतेला फसवण्याची काम केले. शिवसेनेच्या माध्यमातून कोटयवधी रुपयांची होत असलेली विकासकामे पाहून आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले. याप्रसंगी ओंबळीतील रामजी उतेकर, राजीव चिकणे, मंगेश चिकणे, जनार्दन चिकणे, राजेश चिकणे, प्रशांत चिकणे, मयूर चिकणे, सुनील चिकणे, हरी चिकणे, मनीष चिकणे,अनिल चिकणे इत्यादींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.