तालुक्यातील लोहारे येथील सहयोग प्रतिष्ठानच्या साने गुरूजी माध्यमिक विद्यालयामध्ये येत्या रविवार दि. 27 एप्रिलला रॅपिड चेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आकार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय सलागरे यांनी दिली. 15 वर्षांखालील फक्त पोलादपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पहिला गट तर दुसरा खुला गट वयोगट आणि स्पर्धकाचे वास्तव्याचे ठिकाण यांची अट नसलेला असेल, असेही सलागरे यांनी सांगितले.
25 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत स्पर्धकांनी नांवनोंदणी करण्याची अंतिम मुदत असून आंतरराष्ट्रीय नियमांनुसार खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी कोणत्याही रकमेचे प्रवेश शुल्क आकारण्यात आले नाही. खुल्या गटासाठी 1500 रूपयांच्या पहिल्या पारितोषिकापासून सातवे 300 रूपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
15 मिनीटे 03 सेकंदाचा वाढीव कालावधी असलेल्या या स्पर्धेतील खुल्या गटासाठी महिला प्रथम, पुरूष प्रथम, तसेच कालावधीनुसार विजेत्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. 15 वर्षांखालील फक्त पोलादपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठीच्या पहिल्या गटात पहिले 1 हजार रूपयांपासून पाचवे 200 रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून सहाव्या आणि सातव्या क्रमांकासाठी आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे.
नांव नोंदणीसाठी संपर्क :
अमर सलागरे (8887456123),
रामदास सकपाळ (8087929988)
यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष अजय सलागरे यांनी केले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.