तालुक्यातील तहसिल कार्यालयासमोरील सामुदायिक ध्वजारोहण तहसिलदार कपिल घोरपडे यांच्याहस्ते करण्यात आले.
यापूर्वी तालुक्यातील विविध शाळा, ग्रामपंचायती, पंचायत समिती, नगरपंचायत, पोलीस ठाणे, विविध विभागाची कार्यालये, बँका, हॉस्पिटल तसेच सामाजिक संस्थातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पोलादपूर शहरातील मदनभाई शहा, शिरिष साबळे, शंकरराव महाडीक, निवास शेठ, संभाजी साळुंखे, महादेव निविलकर, डॉ.कुमार सुकाळे, अनिल नलावडे तसेच व्यापारी व राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक महिला व विद्यार्थीदेखील उपस्थित होते.
पोलादपूर तहसिल कार्यालयामध्ये माध्यमिक व प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. तहसिल कार्यालयामध्ये तहसिलदार कपिल घोरपडे आणि उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पत्रकारांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी भारतीय सेनादलातील निवृत्त सुभेदार परशुराम दरेकर व सुभेदार बळीराम पवार, हवालदार श्रीकांत पवार तसेच शिवराज पार्टे, सिध्देश पवार, संदीप जाबडे, यशवंत कासार, सुदास मोरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रमोद वीरकर यांनी दिली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.