
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
रयत शिक्षण संस्था सातारा संचलित विद्यामंदिर पोलादपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील 137 जयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले असता पोलादपूर शहरातील शंकरराव महाडीक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तसेच रयत विद्यामंदिरच्या स्थानिक कमिटी सदस्या समाजसेविका प्रिती बुटाला यांच्याहस्ते रांगोळी प्रदर्शन दालनाचे उदघाटन तसेच मुख्य कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले.
यावेळी लोहारे येथील सामाजिक कार्यकर्ते समीर साळुंखे यांच्याहस्तेदेखील रांगोळी प्रदर्शन दालनाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत विद्यामंदिराचे सर्वेसर्वा गर्व्हनिंग बॉडी सदस्य व स्थानिक स्कूल चेअरमन निवास रामचंद्र शेठ होते.
रयत विद्यामंदिराचे प्राचार्य आर.एस. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील 137 जयंती सोहळयात ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख एस.एन.ढगे, इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक एस.के.शिंगटे, गुरूकुल विभागप्रमुख एम.एस.म्हात्रे आदी निमंत्रकांच्या उपस्थितीत कॅप्टन दत्ताराम मोरे, ऍड.सचिन गायकवाड, शंकर दरेकर, सडवलीचे माजी सरपंच बापू जाधव, संभाजी ब्रिगेडचे वैभव सावंत, ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई बुटाला, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या चारूलता मनीष बडगे, वक्रतुंड ग्रुपचे अध्यक्ष अथर्व बुटाला तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कांगोरीगड माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष ढाणे हे प्रमुख व्याख्याते होते. याप्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिंनीनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्याबद्दल वत्तृफ्त्व स्पर्धेत सहभाग घेऊन माहिती कथन केली.
जयंती सोहळयापूर्वी रयत विद्यामंदिर पोलादपूरच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी पोलादपूर शहरामध्ये सवाद्य मिरवणूक व शोभायात्रा काढली.