पोलादपूर: महिला बचत गटांच्याप्रश्नी नगरसेविका अस्मिता पवार आग्रही

Mahila Bachat Gat Poladpur
पोलादपूर (शैलेश पालकर) :
पोलादपूर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर सर्वच महिला बचतगटांच्या रजिस्ट्रेशन आणि अर्थपुरवठयासह सबसिडीचा प्रश्न निर्माण झाला असून पोलादपूर नगरपंचायतीच्या माजी महिला व बालकल्याण सभापती व विद्यमान नगरसेविका अस्मिता उमेश पवार या लवकरच रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर चर्चा केल्यानंतर निवेदन देणार असल्याची माहिती त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली आहे.
पोलादपूर ग्रामपंचायत असताना हद्दीतील सुमारे 10-15 महिला बचत गट रजिस्ट्रेशन झाले असून नगरपंचायत झाल्यानंतर कोणत्याही बचतगटांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया करण्यात आली नाही. ग्रामपंचायत काळात रजिस्ट्रेशन झालेल्या महिला बचत गटांना नगरपंचायतीमध्ये वर्ग करण्यात आले नाहीत. ग्रामपंचायत काळातील 25-30 महिला बचत गटांना सर्व लाभ मिळत असत. मात्र, आता नगरपंचायत झाल्यापासून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ही बँक वगळता कोणत्याही बँकेकडून बचतगटांना अर्थसहाय्य देण्यात येत नसल्याने बचत गटांच्या महिलांना त्यांच्या आर्थिक क्षमता संपल्यानंतर त्यांना बचतगटांच्या कामात वाढ करता येत नाही, याबद्दल नगरसेविका अस्मिता उमेश पवार यांनी नाराजी व्यक्त करीत सद्यस्थितीत पोलादपूर नगरपंचायत क्षेत्रामध्ये 50-60 महिला बचत गट असून नगरपंचायतीमध्ये रजिस्ट्रेशन नसल्याने बँकांकडून रजिस्ट्रेशनची मागणी केली जात आहे. रजिस्ट्रेशन अभावी महिला बचत गटांना अनुदान आणि बँककर्ज उपलब्ध होत नाही तसेच असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याकडे माननीय जिल्हाधिकारी रायगड यांचे लक्ष वेधून घेणार असल्याचे सांगितले.
महिला सक्षमीकरणासाठीचे प्रयत्न बचत गटांद्वारे होणे अपेक्षित असताना रजिस्ट्रेशन व अर्थपुरवठा होत नसल्याने बचत गट तसेच महिलांना मर्यादा येऊन आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. यामुळे बचत गट बंद करून घरकाम व अन्य व्यवसायाद्वारे उपजिविका साधताना महिलांना सक्षम होण्यापासून वंचित राहावे लागणार असल्याने महोदयांनी याप्रश्नी तातडीने लक्ष देऊन पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील महिला आणि महिला बचत गटांसाठी रजिस्ट्रेशनसह अर्थपुरवठा करण्यासाठी सरकारी यंत्रणांना त्वरित आदेश द्यावेत,अशी विनंती यावेळी जिल्हाधिकारी माननीय किशन जावळे यांना करणार असल्याचे यावेळी नगरसेविका अस्मिता उमेश पवार यांनी स्पष्ट करीत यासंदर्भात लेखी निवेदन देणार असल्याचेही सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading