पोलादपूर ते महाबळेश्वर वाई सुरूर रस्त्याचे रूंदीकरणाचे काम गेल्या महिन्यापासून सुरू झाले आहे. या रूंदीकरणामुळे साईडपट्टया तसेच लगतच्या डोंगरातील माती उकरून नदीपात्रालगत भराव केला जात आहे. ाोलादपूर महाबळेश्वर ते वाई सुरूर रस्ता महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या ताब्यात गेल्याने आता रूंदीकरणासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमध्ये डोंगर आणि साईडपट्टीवरील माती सावित्री नदीपात्रात तसेच चोळई नदीपात्रालगत उभे केले असून पावसाळयादरम्यान सावित्री नदीपात्र अधिकच प्रदुषित होण्याची शक्यता आहे.
2021 मध्ये हरित लवादाने सावित्री नदी प्रदुषणाच्या कारणावरून नगरपंचायतीला 7 लाख रूपये दंड आकारला होता. यानंतरही नगरपंचायतीने सावित्री नदीपात्रामध्ये शहरातील घन व द्रव कचरा गोळा करून डम्पिंग करण्यास सुरूवात केली होती. अलिकडेच, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पोलादपूर उपविभागीय कार्यालयांतर्गत क्षेत्रात असलेल्या महाबळेश्वर-वाई ते सुरूर रस्त्याच्या आंबेनळी घाटातील रूंदीकरणास सुरूवात झालेल्या रस्त्यापैकी पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील साधारणत: 24.200कि.मी.रस्ता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीमध्ये असताना दरीच्या बाजूने रुंदीकरण, देखभाल दुरूस्ती तसेच संरक्षक कठडे आणि डोंगरउताराच्या बाजूने रूंदीकरण, डांबरीकरण तसेच साईडपट्टयांचे मजबूतीकरण आदी कामे सातत्याने सुरू राहिली. दर दोनचार वर्षांनंतर दरडी कोसळण्याने आंबेनळी घाटरस्ता सातत्याने बंद ठेऊन कामे करावी लागत असताना 21 जुलै 2021च्या अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाट अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाताहत झाली. यानंतर या रस्त्याच्या कायमस्वरूपी मजबूतीकरणासाठी महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या ताब्यात हा संपूर्ण आंबेनळी घाटरस्ता सोपविण्यात येऊन सातारा बाजूने या रस्त्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर शहर, कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत रानबाजिरे, काटेवाडी, सिध्दार्थनगर, भराववाडी, कापडे कमानीचा परिसर तसेच आड, चांभारगणी, कुंभळवणे, पायटे, दाभिळटोंक पर्यंतच्या या 24.200कि.मी.रस्त्याचे रूंदीकरण होत आहे. पोलादपूर शहरालगत चोळई नदी व सावित्री नदीच्या संगमाच्या परिसरामध्ये साईडपट्टी आणि लगतचा डोंगर खणून त्यातून मातीचा भराव सावित्री नदीतील पोलादपूर नगरपंचायतीच्या जॅकवेलपासून काही अंतरावरील गॅबियन स्ट्रक्चरलगत टाकला जात आहे तर साईडपट्टीच्या मातीचा भराव पैठण रस्त्यावरील चोळईनदीच्या काठावर ढिगारे उभे करून ठेवण्यात आला आहे.
पोलादपूर येथील सावित्री नदीपात्रातील घनकचऱ्याचा विषय गंभीर होत चालला असताना पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावरील मातीचे ढिगारे सावित्री नदीपात्रात आगामी पावसाळयात चिखलमय परिसर करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पोलादपूर तहसिलदारांनी या माती उत्खननासोबतच मातीच्या ढिगाऱ्यांचा योग्य ठिकाणी संचय करण्याचे निर्देश देण्याची आवश्यकता नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.