रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक,अलिबाग सोमनाथ घार्गे यांनी रायगड जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता महत्त्वाकांक्षी प्रकल्प मिशन सद्भाव भावनिक प्रज्ञावंत पोलीस हा प्रकल्प राबविला. या प्रकल्पांतर्गत पोलादपूर पोलीस ठाण्याला मिशन सदभाव भावनिक प्रज्ञावंत पोलीस प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून पोलीस हवालदार स्वप्नील कदम यांना उत्कृष्ट सारथी पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याने पोलादपूर तालुक्यात सर्वत्र अभिमान व्यक्त होत आहे.
मिशन सद्भाव भावनिक प्रज्ञावंत पोलीस या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना लोकांच्या भावनांचा अभ्यास करून त्यांच्या अडचणी सोडवणे तसेच आपल्या कर्तव्यात व्यावसायिकता आणून भावनिक मनाने विचार करून प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाणे याकरिता व पोलिसांचा समाजात सामाजिक सलोखा कसा अत्याधिक होईल व त्यातून पोलिसांचे कर्तव्याचा दर्जा उंचावता येईल, याकरिता आवश्यक ते प्रशिक्षण रायगड जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदार यांना देण्यात आले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पोलादपूर पोलीस ठाणे यांनी मिशन सदभाव भावनिक प्रज्ञावंत पोलीस प्रथम क्रमांक पटकावला असून पोलीस हवालदार स्वप्निल कदम यांना उत्कृष्ट सारथी पुरस्कार मिळाला आहे.
तक्रार देण्याकरता येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची भावना जाणून घेऊन त्यांच्या प्रत्येक अडीअडचणींवर कशाप्रकारे त्यांना मदत करता येईल याबाबत पोलादपूर पोलीस ठाणे कायम प्रयत्नशील असल्याबाबत पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी म्हटले आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलादपूर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.