पोलादपूर पोलिसांची धडक कारवाई: गुरे चोरी करणारे चार आरोपी तीन बैलांसह अटकेत

पोलादपूर पोलिसांची धडक कारवाई: गुरे चोरी करणारे चार आरोपी तीन बैलांसह अटकेत
पोलादपूर (शैलेश पालकर) :
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील घेरारसाळगड भागातील गुरे रायगड जिल्ह्यातील ओंबळी भागातील जंगलात चरत चरत आल्यानंतर त्यापैकी तीन बैलांची चोरी करणाऱ्या चार आरोपींना तीनही बैलांसह पोलादपूर पोलीसांनी ताब्यात घेत घडक कामगिरीचा प्रत्यय दिला आहे. चारही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्याचे निरिक्षक अनिल जाधव यांनी दिली.
पोलादपूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शरद तुकाराम गायकर वय 55 जात-गवळी, व्यवसायशेती, रा. घेरारसाळगड गवळवाडी, ता. खेड जि. रत्नागिरी याचे 3 बैल चरत चरत ओंबळी गावातील जंगलात आले होते दिनांक 25 मार्च 2025 रोजी सायंकाळी ते दि. 26 मार्च 2025 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास चरण्यासाठी सोडण्यात आले असता सदरची बैल चोरण्याच्या उद्देशाने आरोपी मासूम अजीम तालघरकर (वय- 24 रा. शिरवली ता.महाड), मुरशद उस्मान कोर्डेकर (वय 62 रा. शिरवली, ता.महाड), मुकेश पांडुरंग सकपाळ (वय- 40 रा. शिरवली ता. महाड), शब्बीर उस्मान जोगिलकर (वय 38 रा.कापडे बु. ता.पोलादपूर) आले असता मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ओंबळीच्या जंगलामध्ये धडक देत पोलादपूर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल जाधव व तपासिक अंमलदार पोलीस हवालदार सुतार व सहकारी यांनी या धडक मोहिमेत महत्वपूर्ण साथ दिली.
आरोपींकडून पोलिसांनी 25 हजार रूपये किंमतीचा एक तांबडया काळया रंगाचा उभ्या शिंगाचा बैल, 25 हजार रूपये किंमतीचा एक तांबडया रंगाचा बैल, 25 हजार रूपये किंमतीचा एक तांबडया रंगाचा बैल त्याचे तोंडावर सफेद ठिपके व उभे शिंगे असलेला असे एकूण 75 हजार रूपये किंमतीचे बैल जप्त केले आहेत. चारही आरोपींविरोधात पोलादपूर पोलिसांनी गुन्हा र.नं. 19-2025 भा.न्या.सं. 303(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading