नगरपंचायत पोलादपूरमध्ये गेल्या आठ वर्षापासून सत्तेच्या संगीत खुर्चीचा खेळ चांगलाच रंगला असून स्वीकृत नगरसेविका म्हणून मृगया वैभव शहा यांची निवड झाली आहे.
नगरपंचायत पोलादपूरच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग बारा मधून केवळ आठ मतांनी तत्कालीन काँग्रेस उमेदवार श्रावणी मिलिंद शहा यांच्याकडून पराभूत झालेल्या शिवसेना उमेदवार मृगया वैभव शहा यांना शेवटच्या दीड वर्षासाठी स्वीकृत नगरसेविका म्हणून संधी देण्यात आली आहे.
यापूर्वी प्रभाग सतरा मधून दिलीप भागवत यांच्याकडून पराभूत झालेले शिवसेना शहर प्रमुख सुरेश पवार यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली होती. गेल्या आठवड्यात सुरेश पवार यांनी स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदावर मृगया वैभव शहा यांना संधी देण्यात आली आहे.
शिवसेनेच्या प्रभारी सभापती कांचन बुटाला यांच्या नात असलेल्या मृगया वैभव शहा या पोलादपूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अभय शरद बुटाला यांच्या कन्या आहेत. अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या मृगया वैभव शहा या पोलादपूर नगरपंचायतीतील सर्वात जास्त शिकलेल्या नगरसेविका ठरल्या आहेत.
मृगया वैभव शहा यांनी मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला तेव्हा शहर प्रमुख सुरेश पवार, उपशहर प्रमुख नितीन भोसले, नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, नगरसेवक मनोज प्रजापती, नागेश पवार, सोनल गायकवाड, स्नेहा मेहता, निखिल कापडेकर सुनिता पार्टे, अस्मिता पवार, विनायक दीक्षित, भाजपच्या अंकिता जांभळेकर आदी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.