पोलादपूर नगरपंचायत तर्फे २०२४- २५ आर्थिक वर्षातील दिव्यांग बांधवांचे धनादेश वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पोलादपूर नगरपंचायतीचे प्रभारी नगराध्यक्ष प्रसाद इंगवले, माजी नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक सुरेश पवार, महिला बालकल्याण सभापती सुनीता पार्टे, नगरसेविका अस्मिता पवार, स्नेहा मेहता, शिल्पा दरेकर तसेच लेखापाल प्रशांत पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सुमारे पन्नासहून अधिक दिव्यांग बांधवांना प्रत्येकी चार हजार रुपये रकमेचा धनादेश देण्यात आला. यावेळी दिव्यांग बांधव संघटनेच्या अध्यक्षा आलिया धामणकर तसेच ज्येष्ठ समाजसेवक मंगेश नगरकर, मोहम्मद मुजावर अन्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.
याप्रसंगी मंगेश नगरकर तसेच अध्यक्षा आलिया धामणकर यांनी आपले मत मांडले. याप्रसंगी नगराध्यक्ष प्रसाद इंगवले यांनी, उपनगराध्यक्ष तसेच प्रभारी नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळातील हा पहिलाच कार्यक्रम असून दिव्यांग बांधवांसोबत संवाद साधायला मिळाल्आयाने आनंद होत आहे. दिव्यांगाचे आयुष्यात खडतर असून दिव्यांग अवस्थेवर खऱ्याअर्थाने मात करतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपण समाज प्रतिनिधी या नात्याने पूर्णपणे यांच्या पाठीशी राहणार आहोत.
आगामी काळामध्ये मंत्री ना.भरत गोगावले यांच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांपर्यंत मिळवून देण्याकरिता आम्ही सर्व नगरसेवक प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी रुपेश जाधव यांनी केले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.