पोलादपूर नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात मनसेचं आमरण उपोषण

Poladpur Nagarpanchayat
पोलादपूर (शैलेश पालकर) :
गेल्या काही वर्षांत पोलादपूर शहर आणि नगरपंचायती संदर्भातील विविध प्रश्नी उपोषणाद्वारे आंदोलन करून जनतेसह प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोलादपूर तालुकाध्यक्ष दर्पण दरेकर यांनी महाराष्ट्र दिनी पोलादपूर नगरपंचायतीच्या भ्रष्ट व बेकायदेशीर कारभाराविरोधात आमरण उपोषणाचे हत्यार उपसण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरामध्ये बांधलेल्या मंडपामध्ये आज गुरूवार दि. 1 मे 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजता जनहितासाठी वारंवार दिलेल्या निवेदनांकडे पोलादपूर नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेविरोधात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांची न होणारी अंमलबजावणी यामुळे मनसे पोलादपूर तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत पोलादपूर एसटी स्थानकाबाहेरील सांडपाण्याचे तळे, पूर्णवेळ मुख्याधिकारी, पोलादपूर बसस्थानकातील स्वच्छतागृहाचे नूतनीकरण स्वाक्षरी मोहिम, विद्यार्थ्यांसाठी भुयारी मार्गासाठी स्वाक्षरी मोहिम आदी उपोषण व मोहिमांद्वारे जनहिताचे प्रश्न मांडले असून आता आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने उद्या मंडपामध्ये जनतेचा जोरदार पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, दर्पण दरेकर यांच्या आमरण उपोषणासाठी उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचे स्वागत करण्यात आल्याने लग्नाच्या मांडवात मुंज उरकून घेण्यासाठी गौरव रथयात्रा मनसेने प्रायोजित केली होती अथवा दर्पण दरेकर यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सहकार्य म्हणून मंडप आधीच उभारला आहे, याबाबत पोलादपूरकरांमध्ये भुवया उंचावल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading