नगरपंचायत पोलादपूरच्या स्थापनेनंतर शिवसेनेच्या सत्तेसोबत काँग्रेस नगरसेवक नागेश पवार गेल्यानंतर पुन्हा निवडणूक लढवित नगराध्यक्ष झाले. नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर काँग्रेसचे सर्व सहा नगरसेवक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये गेले आणि शिंदे शिवसेना भाजप महायुतीप्रमाणे भाजपच्या अंकीता निकम जांभळेकर यांना नियोजन, अर्थ, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापतीपद देण्यात आले.
यावेळीदेखील विषय समिती सभापती निवडीवेळी उबाठा सेनेमध्ये फूट पडून निखिल कापडेकर यांची पाणीपुरवठा व दिवाबत्ती समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष नागेश पवार यांच्या राजिनाम्याने सार्वजनिक आरोग्य मालमत्ता कर विषयाचे पदसिध्द सभापती पद रिक्त राहिले असून नगरपंचायतीमधील विरोधी पक्ष महायुतीत गेल्यास मतदारांची घोर फसगत होणार असून विरोधी पक्षाच्या नेत्याला उपनगराध्यक्षपद देऊन सार्वजनिक आरोग्य मालमत्ता कर या विषयाचे पदसिध्द सभापतीपद दिले जाण्याची शक्यता आहे.
पोलादपूर नगरपंचायतीचे विरोधी गटनेता दिलीप भागवत तसेच स्वप्नील भुवड तसेच श्रावणी मिलींद शहा, आशा सचिन गायकवाड आणि तेजश्री अभिषेक गरुड या पाच विरोधी नगरसेवकांनी विरोधी गटाकडून कोणत्याही सदस्याचे नांव या विषय समित्यांसाठी सुचविण्यास विरोध दर्शविला असून गुरूवारी पिठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.ज्ञानोबा बाणापुरे यांना एका निवेदनाद्वारे नकार देण्यात आला. गेल्या वर्षभरामध्ये विषय समिती सभापती व सदस्यांची एकही एकत्रित सभा आयोजित न झाल्याचे कारण यावेळी विरोधी गटनेता दिलीप भागवत यांनी निवेदनामध्ये दिले आहे.
दि. 30 जानेवारी 2025 रोजी विविध विषय समितीच्या निवडीवेळी सार्वजनिक बांधकाम समिती सभापती सिध्देश संजय शेठ यांची निवड झाली तर उर्वरित चार सदस्य पदांपैकी सत्ताधारी स्वीकृत नगरसेवक सुरेश पवार व मनोज प्रजापती, पाणीपुरवठा व दिवाबत्ती समितीच्या सभापतीपदी निखिल कापडेकर तर सदस्यपदी सत्ताधारी नगरसेवक विनायक दिक्षित व नागेश पवार यांची निवड झाली आहे. भाजपच्या अंकीता निकम जांभळेकर यांना नियोजन, अर्थ, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती पद आणि सदस्य पदी सत्ताधारी नगरसेविका शिल्पा दरेकर व स्नेहल मेहता यांची निवड झाली आहे.
महिला बालकल्याण सभापतीपदी सुनिता पार्टे व सदस्यपदी अस्मिता पवार यांची यांची निवड झाली आहे. उपनगराध्यक्ष नागेश पवार यांच्या राजिनाम्याने सार्वजनिक आरोग्य मालमत्ता कर विषयाचे पदसिध्द सभापती पद रिक्त राहिले आहे. विरोधी गटाकडून कोणत्याही समितीवर सदस्यांची नांवे सुचविण्यात आली नसल्याने उपनगराध्यक्ष नागेश पवार यांच्या राजिनाम्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदावर विरोधी गटाचे नगरसेवकांनी महायुतीमधील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यातीलच एकाची वर्णी लागण्याची शक्यता दिसून येत आहे.
महाविकास आघाडीमध्ये असूनही शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवक एकमेकांच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या भुमिकेमध्ये होते. यानंतर राज्यातील महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेमध्ये गेलेल्या सर्व नगरसेवकांना भाजपच्या अंकिता निकम जांभळेकर यांची साथ मिळाली. मात्र, लवकरच काँग्रेस पक्षातून निवडून येत उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांचा त्यांच्या नेत्यांसोबत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाल्यास सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक हे महायुतीचे होणार असल्याने पोलादपूर नगरपंचायतीमधील विरोधी पक्षच विसर्जित होऊन पोलादपूरकर मतदारांची घोर फसगत होण्याची शक्यता नजिकच्या काळामध्ये दिसून येत आहे.
दरम्यान सत्ताधारी शिवसेनेने प्रसाद इंगवले यांच्याकडून पाणीपुरवठा व दिवाबत्ती समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी काढून घेतल्यानंतर त्यांचे कोणत्याही विषय समितीच्या सदस्यपदासाठी देखील नांव सुचविले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत, असून भविष्यात नगराध्यक्षपदाचे आरक्षण एससी कॅटेगरीतील झाल्यास इंगवले यांच्याप्रमाणे आणखी एक नगरसेवक सत्ताधारी व विरोधीपक्षाच्या एकत्रिकरणामुळे होणार असून नागरिकांना मात्र त्यांच्या समस्यांसाठी थेट नगरपंचायतीविरोधात रस्त्यावर उतरावे लागण्याची वेळ ओढविणार आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.