पोलादपूर : दरड ग्रस्त पुनर्वसन प्रकरण ! पूर्णत: व अंशत: बाधितांच्या तुलनेत अजिबात बाधा न झालेल्या इमारतींसाठी शासन निर्णय लाभदायक

poladpur-darad-gav
पोलादपूर ( शैलेश पालकर ) : 2021 साली पोलादपूर तालुक्यातील साखर ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील सुतारवाडी आणि देवळे गु्रपग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे येथे दरड कोसळल्यानंतर अद्याप तेथील ग्रामस्थांचे पुनर्वसन झाले नाही. शासनाने पावसाळी अधिवेशनापूर्वी शासननिर्णयानुसार तब्बल 3 कोटी 94 लाख 60 हजारांच्या निधी उपलब्धतेचा शासननिर्णय जाहिर केला आणि याप्रश्नी आधीच विधायक विरोधकांचे सत्ताधाऱ्यांमध्ये रूपांतर झाले असल्याने कोणीही चर्चा करणे पसंत केले नाही. परिणामी, पूर्णत: व अंशत: बाधितांच्या तुलनेत इमारतींना अजिबात बाधा न झालेल्यांसाठी शासननिर्णय आर्थिक लाभदायक ठरला आहे.
 पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथे दि. 21 आणि 22 जुलैरोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मौजे साखर-सुतारवाडी येथील घरावर दरड कोसळून जिवित्तहानी झालेली आहे. यामध्ये 4 बाधित कुटूंबांपैकी 5 जण मयत झाले असून 3 पुरूष आणि 2 महिलांचा समावेश आहे. 06 जण जखमी झाले तर 17 जनावरे मयत झाली आहेत. याठिकाणी जेएसडब्ल्यू कंपनीच्या 7 कन्टेनरच्या साह्याने खासगी मालकीच्या जागेमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. साखर सुतारवाडी येथे भुसंपादनकामी 64 लक्ष 28 हजार 148 रूपये शासनाकडून प्राप्त झाले असून 2 लाख 50 हजार 870 रूपये कन्टेनरसाठी चौथरा उभा करण्यासाठी आणि नळपाणीपुरवठा योजना करण्यासाठी 2 लाख 79 हजार 821 रूपये खर्च करण्यात आले असल्याची खात्री पाहणी दौऱ्यामध्ये तहसिलदार घोरपडे यांनी केली. केवनाळे येथे पूर्णत: बाधित 7 घरे आणि अंशत: बाधित 22 घरे असताना अंशत: बाधितपैकी 10 घरांना अनुदान वाटप करण्यात आले आहे. मात्र, यावेळी 128 घरांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता व्यक्त करण्याा आली असून जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियातर्फे यांच्या अहवालानुसार 3-76-91 हे.आर. क्षेत्राची सक्तीच्या भुसंपादनासाठी शिफारस करण्यात आली आहे.
पोलादपूर तालुक्यातील दुसरे दरडग्रस्त गांव असलेल्या साखर सुतारवाडीमध्ये 6 मयत असून 1 पुरूष आणि 5 महिलांचा मृतांमध्ये समावेश आहे. 12 घरे पुर्णत: आणि 10 घरे अंशत बाधित असून सुतारवाडी येथे 38 घरांचे 44 कुटूंबांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे. येथील 230 लोकसंख्येपैकी 118 पुरूष आणि 112 महिला असून 12 घरांचे पुर्णपणे नुकसान तर 10 घरांचे अंशत: नुकसान झाले.  7 बाधित कुटूंबांपैकी 5 जण मयत झाले असून 3 पुरूष आणि 2 महिलांचा समावेश आहे. 16 जण जखमी झाले तर 32 जनावरे मयत झाली आहेत. सुतारवाडी येथे कायमस्वरूपी पुनर्वसनाकामी साखर सुतारवाडी येथे भुसंपादनकामी 38 लक्ष 41 हजार 786 रूपये शासनाकडून प्राप्त झाले असून 2 लाख 54 हजार 870 रूपये कन्टेनरसाठी चौथरा उभा करण्यासाठी आणि नळपाणीपुरवठा योजना करण्यासाठी 2 लाख 54 हजार 870 रूपये खर्च करण्यात आले असल्याची खात्री पाहणी दौऱ्यामध्ये तहसिलदार घोरपडे यांनी केली. खासगी मालकांच्या संमतीने 1-84-00 हेक्टर आर या क्षेत्राचे निश्चिती करण्यात आली पण ती जीएसआयच्या सर्व्हेनुसार नाकारण्यात आली. जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियातर्फे यांच्या अहवालानुसार 02-27-90 हे.आर. क्षेत्राची सक्तीच्या भुसंपादनासाठी शिफारस करण्यात आली. याबाबत स्वत: तहसिलदार घोरपडे यांनी शासनाचे आणि जीएसआयचे अहवालानुसार दोन्ही दरडग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी महसूल खात्यातर्फे तहसिलदार आणि तलाठी यांनी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केली.
पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि सुतारवाडी येथील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनकामी दोन वर्षांनंतरही शासनाकडून निधीची उपलब्धता न झाल्याने पुनर्वसनकामामध्ये प्रचंड हलगर्जीपणा होऊन दरडग्रस्तांना कन्टेनरच्या तात्पुरत्या निवासामध्ये उन, पाऊस आणि थंडीचा सामना करीत जगावे लागले आहे. शासनाकडून भुसंपादन आणि नागरी सुविधांसाठी निधी वितरित केला असून दि. 24 जुलै 2023 रोजी शासन निर्णय क्रमांक: दग्रपु 3123-41-प्रक्र-32-र-5 अन्वये कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या प्रस्तावास मान्यता देताना शासनाने 3 कोटी 95 लाख 60 हजार रूपयांचा निधी मंजूर केल्याचे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार देवळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे येथे पुनर्वसनासाठी 128 घरांची संख्या निश्चित करून प्रत्येकी 2 लाख 30हजार रूपयांप्रमाणे 2 कोटी 94 लाख 40 हजार रूपयांचा निधी तर साखर सुतारवाडी येथे पुनर्वसनासाठी 44 घरांची संख्या निश्चित करून प्रत्येकी 2 लाख 30हजार रूपयांप्रमाणे 1 कोटी 01 लाख 20 हजार रूपयांचा निधी असा एकूण 172 घरांच्या पुनर्वसनाचा निधी मंजूर केला आहे.
मात्र, गेल्या दोन वर्षांत ज्या दरडग्रस्तांची घरे पूर्णत: अथवा अंशत: बाधित आहेत आणि जी घरे अजिबात बाधित नसताना केवळ दरडग्रस्त गावांमध्ये उभी आहेत अशांसाठी पुनर्वसन घरकुलांचा निधी उपलब्ध झालेला आहे. पूर्णत: अथवा अंशत: बाधित घरांतील दरडग्रस्त कुटूंबियांना इमारती धोकादायक झाल्याने गेल्या दोन वर्षांच्या काळामध्ये स्थलांतरीत होऊन अन्यत्र भाडयाने घरकुलं घ्यावी लागली आहेत. साखर सुतारवाडीतील 12 घरांचे पुर्णपणे नुकसान तर 10 घरांचे अंशत: नुकसान झाले असताना पुनर्वसनासाठी 44 घरांची संख्या निश्चित करून प्रत्येकी 2 लाख 30हजार रूपयांप्रमाणे 1 कोटी 01 लाख 20 हजार रूपयांचा निधी देण्यात आल्याचे शासन निर्णयामध्ये नमूद केले आहे.
केवनाळे येथे पूर्णत: बाधित 7 घरे आणि अंशत: बाधित 22 घरे असताना पुनर्वसनासाठी 128 घरांची संख्या निश्चित करून प्रत्येकी 2 लाख 30हजार रूपयांप्रमाणे 2 कोटी 94 लाख 40 हजार रूपयांचा निधी  शासन निर्णयात नमूद करण्यात आल्याने ज्यांची घरे पूर्णत: भुईसपाट झाली आहेत त्यांना केवळ 2 लाख 30 हजार रूपयांची तरतूद तर ज्यांच्या घरांना जरादेखील हानी पोहोचली नाही अशांनाही 2 लाख 30 हजार रूपयांची तरतूद करण्यात आल्याने अंशत: आणि पूर्णत: बाधित दरडग्रस्तांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading