पोलादपूर तालुक्यात रात्रंदिवस नाकाबंदी, निवडणूक पार्श्वभुमीवर कडेकोट बंदोबस्त

Police Chaking Poladpur
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
तालुक्यातील आंबेनळी घाटातील रायगड पोलीस विभागातर्फे रात्रंदिवस नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करताना लोकसभा निवडणूक पार्श्वभुमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातून उतरणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी रायगड पोलीस विभागातर्फे नाकाबंदी करण्यात आली आहे. या तपासणी नाक्यावर दोन बॅरिकेटस उभे करून एका छोटयाशा तात्पुरत्या शेडखाली बसलेले खाकी वर्दीतील पोलीस कर्मचारी तसेच एक वाहतूक पोलीस आणि रात्री मोठया संख्येने खाकी वर्दीतील पोलीस कर्मचारी वाहनांची कसून तपासणी करीत असल्याचे दिसून येत आहे. कापडे बुद्रुक येथील पेट्रोल पंपासून काही अंतरावर हा तपासणी नाका उभारण्यात आला असून दिवसांतून संशयास्पदरित्या आढळल्यास संबंधित वाहनाची तपासणी वाहन थांबवून केली जात असल्याचे दिसून येत आहे.
यावेळी वाहनचालकांकडून सहकार्य केले न गेल्यास यावेळी कमी संख्येने असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून पोलादपूर पोलीस ठाण्याला कळविले जाऊन पोलादपूर पोलीसांकडून हे वाहन चोळई लेप्रसी मिशन पुलापर्यंत अडविण्यात येण्याची तत्परता दाखविण्यात येत आहे. रात्री साधारणपणे सर्वच वाहनांची तपासणी व चौकशी केली जात असून रात्रंदिवसामध्ये साधारण 32  ते 50 वाहनांची तपासणी व कागदपत्रांची खातरजमा केली जात आहे.
7 मे 2024 पर्यंत या तपासणी नाक्यावर नाकाबंदी करून वाहनांची झाडाझडती घेण्यात येणार असून वाहनांतून मद्यवाहतूक, अवैध शस्त्रवाहतूक, रोख रक्कम अथवा दंगल तसेच अनुचित घटना घडविण्यासाठी मानवी वाहतूक होत असल्यास संबंधित वाहने अडविण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतुक पोलीस धायगुडे आणि अन्य पोलीस कर्मचारी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading