
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक परिसरातील शेकडो मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांनी केला आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रवेशकर्त्यांनी, “काँग्रेसच्या जातीपातीच्या राजकारणामुळे आम्ही विकासापासून वंचित राहिलो. आमदार भरत गोगावले यांनी महाड विधानसभा मतदारसंघात हजारो कोटींचा निधी आणला, त्यामुळे विकासाच्या विश्वासावर आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत,” असे मत व्यक्त केले.
या समारंभात आमदार भरत गोगावले, कोकण विभाग युवासेना कोअरकमिटी सदस्य विकास गोगावले, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, अनिल दळवी, प्रकाश गायकवाड, संजय शिंदे आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.