पोलादपूरच्या ग्रामदैवतांचा होलिकोत्सव सोहळा बुधवारी रात्री हळकुंडापासून प्रचंड उत्साहात तुडुंब गर्दीत सुरू झाला असून गुरूवार सायंकाळी भैरवनाथनगर सहाणेवर पालखीतून ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरी रवळनाथांचे पालखीतून आगमन झाले आणि मध्यरात्री हजारो महिला पुरूष ग्रामस्थांच्या उपस्थितीत संकासुरांच्या सहभागाने होळी पेटविण्यात आल्यानंतर होलिकोत्सव प्रचंड उत्साहात सुरू झाला आहे. यावर्षी जत्रोत्सव 9 एप्रिलला असल्याचे देवस्थानचे सरपंच बाबूराव महाडीक आणि पदाधिकारी कार्यकारिणी सदस्यांनी दिली.
बुधवारी हळकुंड आणण्यासाठी रात्री जमलेल्या ग्रामस्थांनी पहाटे 3 वाजेपर्यंत हळकुंड गोळा केले. गुरूवारी सेवेकऱ्यांच्या कुटूंबांकडून देवांची रूपं स्वच्छ करून आणल्यानंतर देवस्थानच्या मंदिरात पालखीमध्ये सजविण्यात आली. सायंकाळी पालखी भैरवनाथनगर सहाणेवर सवाद्य मिरवणुकीने आली. यावेळी भैरवनाथ नगरातून संकासुरांनीदेखील उपस्थिती दर्शवित सहाणेवरील ग्रामदैवतांच्या पालखी आगमन सोहळयामध्ये विलक्षण आनंद निर्माण केला. सायंकाळी भाविकांची सहकुटूंब सहपरिवार रेलचेल सहाणेवर ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी सुरू झाली. यानंतर रात्री होळी रचण्यासाठी शेकडो तरूण सरसावले आणि अध्यक्ष बाबूराव महाडीक आणि उपाध्यक्ष ज्ञानदेव पार्टे यांच्याहस्ते विधीवत पूजा करण्यात येऊन होळी प्रज्वलन करण्यात आले. यावेळी हजारो नारळ होळीमध्ये भाविकांकडून टाकण्यात आले आणि मनोभावे हात जोडून सारे आपआपल्या घरी गेले.
शुक्रवारी सकाळी धुलीवंदन करण्यात आल्यानंतर रात्री भजन व काठी नाचविण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शनिवारी भैरवनाथनगर महिला भजन व पोलादपूर शहर क्रिकेट संघटनतर्फे नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा, रविवारी श्रीसत्यनारायणाची महापूजा व तांबडभुवन भजन, सोमवारी रात्री आदिशक्ती भजन मंडळ, मंगळवारी रात्री गावसभा होऊन देवांचा गोंधळ आयोजित करण्यात आला आहे तर त्यानंतर ग्रामदैवतांच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा सुरू झाल्यानंतर रंगपंचमीच्या उत्साहाला उधाण येणार आहे.
यावर्षी दरवर्षीप्रमाणे चैत्र शुध्द द्वादशीला बुधवार, दि. 9 एप्रिलला भैरवनाथ नगर सहाणपरिसरामध्ये वार्षिक जत्रौत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.