पेण शहरात दिवसाढवळ्या घरफोडी, सराईत चोरटा मुद्देमालासह जेरबंद

Chor Pen Murtee

PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
पेण पोलीस ठाणे हद्दीत दिवसाढवळ्या घरफोडीचा प्रकार उघडकीस आला असून, सरस्वतीची पंचधातुची मूर्ती चोरी करणाऱ्या आरोपीस पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे.
दरम्यान,  दि. 26 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 12:30 ते 3:30 या वेळेत, ठाकुर कॉम्प्लेक्स, चिंचपाडा रोड, सरकारी रुग्णालयाच्या मागील परिसरात ही घटना घडली. फिर्यादी जगन्नाथ कृष्णा ठाकूर (वय 57) यांनी 20 वर्षांपूर्वी त्यांच्या इमारतीच्या तळमजल्यावर सरस्वतीची मूर्ती स्थापन केली होती. या मूर्तीवर 1 किलो 250 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुलामा होता.
घटनेच्या दिवशी, तळमजल्याचा ग्रिलचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात आरोपीने 95,000 रुपये किंमतीची, 15-18 किलो वजनाची मूर्ती चोरी केली. घटनेनंतर पेण पोलीस ठाण्याने तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे कसून तपास केला. तपासादरम्यान, आयटीआय कॉलेजजवळच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या तरुण विलास चव्हाण (वय 20) याला अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली सरस्वतीची मूर्ती हस्तगत करण्यात आली आहे. 
पेण पोलिसांनी अवघ्या काही तासांत हा गुन्हा उघडकीस आणत स्थानिकांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. सदरील या घटनेचा अधिक तपास पेण पोलिस निरीक्षक संदीप बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading