श्री साई बाबांची मानाची पालखी मिरवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओम साई पदयात्रा मित्र मंडळ पेण तर्फे भव्यदिव्य मिरवणुकीचे पेण शहरात आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी संपूर्ण पेण शहर साईमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. पेण साई मंदिर कासार तलाव येथून सायंकाळी पाच वाजता विद्युत रोषणाई, ब्रॉसबँड पथकाच्या सुंदर संगीताच्या तालावर मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. या मिरवणूक सोहळ्यामध्ये चलचित्र रथ समाविष्ट होणार आहेत. यामध्ये द्वारकामाई मंदिर, बैलगाडी हाकताना साईबाबा, हुबेहुब दिसणारे साईबाबा यांचा विशेष समावेश असतो.
पेण साई मंदिरा पासून सुरू होणारी मिरवणूक तेरा घरांची आळी, चावडी नाका, आंबेडकर चौक, नगरपालिका चौक, राजू पोटे मार्ग, कोळीवाडा, महाविर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कासार आळी, हनुमान आळी आणि पुन्हा साई मंदिर येथे फिरणार आहे. पालखी मार्गावर सर्वत्र भगवे पताके, भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. घरासमोर मिरवणूक आल्यानंतर प्रत्येक महिला आरती ओवाळून औक्षण करत असते. शेवटी साई बाबांच्या महाआरतीने व महाप्रसादाने मिरवणुकीची सांगता होणार आहे.
शुक्रवारी सकाळी 6 वाजता साई बाबांची पालखी पायी चालत शिर्डीकडे मार्गस्थ होणार आहे. गेली 16 वर्ष ओम साई पदयात्रा मित्र मंडळ पेण ते शिर्डी पर्यंत साई पालखीची सेवा करत आहेत. सदर मिरवणूक पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी ओम साई पदयात्रा मित्र मंडळाचे सर्वेसर्वा कल्पेश ठाकूर, मिथिलेश भानुशाली व त्यांचे शेकडो सहकारी साई सेवक गेली महिनाभर दिवस रात्र मेहनत घेत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.