पेण शहरातील गुरुकृपा आईस्क्रीम पार्लरमध्ये चोरीच्या घटनेचा पर्दाफाश; फणस डोंगरीचा चोरटा जेरबंद

Chor Ganesh Pen

PEN न्यूज ऑनलाइन टीम :

पेण शहरात १९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री १०:५५ वाजता गुरुकृपा आईसक्रिम पार्लरच्या पाठीमागील दरवाजातून चोरीची घटना घडली. याचा पेण पोलिस स्टेशन मध्ये  गु.र.नं. २५३/२०२४ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३)(४), ३०५(a), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात आरोपीने दुकानाच्या पाठीमागील दरवाजाचे पत्रे तोडून हात घालून आतमधील कडी उघडली. दुकानातील गल्ल्याच्या ड्रॉवरचा लॉक कोणत्यातरी हत्याराने तोडून २० हजार रुपये आणि महत्वाची कागदपत्रे चोरीस नेली. याबाबत तक्रार पेण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
पोलीसांनी गोपनीय आणि तांत्रिक बाबींचा आधार घेत तपास सुरू केला. २४ तासाच्या आत पोलिसांनी आरोपीचा शोध लावला आणि आरोपी गणेश विशाल मेहर (वय-१९, रा. गोकुळ नगर, फणसडोगंरी, पेण) यास अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेले संपूर्ण २० हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
ही कारवाई पेण पोलीस ठाण्याचे मा. पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग आणि पथकातील अंमलदार एएसआय राजेश पाटील, हेड कॉन्स्टेबल प्रकाश कोकरे, संतोष जाधव, राजेंद्र भोन, सचिन होस्कोटी, सुशांत भोईर, अजिंक्य म्हात्रे, गोविंद तलवारे आणि अमोल म्हात्रे यांनी केली आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार ८८५ व्हसकोटी हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading