पेण येथे स्काउट गाईड कॅम्पच्या तंबूंना पेट्रोल बॉम्ब हल्ला; ४८ तासांत आरोपी गजाआड

Pen Petrol Bomb Aatak Aropi
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
पेण शहरातील शिक्षण महिला समितीच्या इंग्रजी माध्यम शाळेत इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय मैदानावर स्काउट-गाईड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्पसाठी मैदानावर सहा तात्पुरते तंबू उभारण्यात आले होते.
कॅम्पचे सर्व कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर रात्री २ वाजता विद्यार्थी, शिक्षक आणि स्टाफ वर्गखोल्यांमध्ये झोपण्यास गेले. पहाटे ४ वाजता गुरुकुल शाळेच्या वॉचमनला मैदानावर काहीतरी जळत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ याबाबत शिक्षक व स्टाफला माहिती दिली.
अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पेट्रोल बॉम्ब टाकल्याने एका तंबूला आग लागून तो संपूर्ण जळून खाक झाला. या घटनेबाबत पेण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पेण पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील ५५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मात्र आरोपीने छुप्या मार्गाचा वापर केल्याने तो हाती लागत नव्हता. साक्षीदारांची पडताळणी, गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ४८ तासांत गुन्ह्याचा छडा लावत आरोपी समीर नरदास पाटील (रा. वढाव, ता. पेण) याला अटक केली आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पेण पोलीस करत आहेत.
Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading