रायगड जिल्ह्यातील पेण शहरातील मौजे म्हाडा वसाहतीत एका 37 वर्षीय तरुणास विक्रीसाठी घेऊन चाललेला गांजा नावाचा अंमली पदार्थ रंगेहात पकडून पेण पोलिस ठाण्यात तरुणा विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १०/११/२०२४ रोजी 05:20वाजण्याच्या दरम्यान म्हाडा कॉलनी रोड पेण येथे सुशील राजाराम जोशी (वय ३८ वर्षे रा.नवीन वसाहत गणेश मंदीर जवळ )हा त्याच्या ताब्यातील१,३०,००० रु. किंमतीची एम.एच. ०६.सी.एन.९५८५ या स्कुटीवरुन, ३११६०/-रु. किंमतीचा पांढ-या रंगाचा पिवळे झाकण असलेल्या व झाकणावर इंग्रजीमध्ये (कारगील) असे लिहिलेला प्लास्टीकचा ड्रम त्यामध्ये एकुण १५५८ ग्रॅम वजनाचे छोटया प्लास्टीकच्या पाउचमध्ये पैंक केला निव्वळ गांजा हा अंमली पदार्थ, १४४८०/-रु किंमतीचे निळया रंगाच्या प्लास्टीक पिशवीमध्ये असलेला ७२४ ग्रॅम वजनाचा सुटा गांजा हा अंमली पदार्थ, २००/- रु काळया रंगाचा वजन काटा असा एकूण १,७५,८४०/- रुपये एकुण मुददेमालासह बेकायदेशिर रित्या वाहतुक करतांना व ताब्यात बाळगताना मिळुन आला.
याबाबत पेण पोलिस ठाण्यात २९८/२०२४ एन.डी.पी.एस. कायदा सन १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश राजपूत करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.