पेण मतदार संघात अतुल म्हात्रे यांचं पारडं जड 

Atul Mhatre Roha Prachar
पेण मतदार संघात अतुल म्हात्रे यांना प्रचारात जनतेचा वाढता प्रतिसाद
कोलाड ( श्याम लोखंडे ) :
पेण रोहा सुधागड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शेकापचे अधिकृत उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचारार्थ या मतदार संघात शहरी भागासह ग्रामीण भागात देखील त्यांच्या प्रचाराला जनतेतून वाढता पाठिंबा तसेच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रोहा तालुक्यातील आंबेवाडी जिल्हा परिषद मतदार संघात तसेच खांब आणि आंबेवाडी पंचायत समिती गणात तसेच मतदार संघात त्यांनी सुतारवाडी, येरल, पहूर,कोलाड,आंबेवाडी,खांब, विठ्ठलवाडी रजखलाटी,मेढ विभाग,मालसई, उडदवणे, देवकान्हे, चिल्हे, तळवली तर्फे अष्टमी सह सर्व भागातील गावागावात मतदारांच्या गाठी भेटी घेत घरोघरी केलेल्या प्रचारात सर्व नागरिकांनी उच्च शिक्षित होतकरू आणि सामाजिक बांधिलकी म्हणून अतुल म्हात्रे यांना वाढता पाठिंबा तसेच प्रतिसाद मिळत आहे.
प्रस्थापितांवर मतदार नाराज 
पेण मतदार संघात मागील २०१९ च्या निवडणुकीत पहिल्यांदाच केंद्रातील मोदीलाट म्हणून भाजप उमेदवार यांना संधी देत रविशेठ पाटील यांना भाजपने दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष देत निवडून दिले मात्र दिलेल्या आश्वासनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने पेण मतदार संघात कोणतेही विकास कामांवर सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तर राज्यात भाजप सत्तेत आल्यावर रविशेठ पाटील यांना मंत्री करू या भूलथापांना येथील मतदार यांनी साथ देत यावर मतांची विभागणी झाली आणि रविशेठ पाटील यांना पाठिंबा देत विजयी केले.
परिवर्तनाची दिशा
खासदार सुनील तटकरे यांचा धैर्यशील पाटील यांना पाठिंबा असताना देखील ते पराभूत झाले त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पेण मतदार संघात आता कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता नवी परिवर्तनाची दिशा येथील मतदार बदलण्याच्या वाटेवर असताना दिसत आहेत तर दुसरीकडे मात्र या संघात एकुण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असले तरी खरी लढत हि तिरंगी होत असल्याने उमेदवारांची प्रचाराठी मोठी कसरत होत असताना दिसत आहे.
मतदार नक्की कौल कोणाला देणार…
या विधानसभा मतदार संघात एकुण सात उमेदवार निवडणुक लढवत आहेत. त्यापैकी तिरंगी लढतीत महायुती भाजपचे विधानसभेचे विद्यमान आमदार उमेदवार रविशेठ पाटील यांच्या विरोधात शेकापचे अतुल म्हात्रे तर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे प्रसाद भोईर यांच्यामध्ये चांगलीच लढत आपल्याला २० तारखेला पहायला मिळत आहे. खरंतर या मतदार संघात महाविकास आघाडीचे दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे असल्याने मतदार नक्की कोणाला कौल देणार शिवसेना की शेकाप तर मतदार संघात नवे परिवर्तन म्हणून मतदार राजे कोणता उमेदवार विधानसभेत पाठवणार हे वीस तारखेच्या मतदानानंतर समजणार आहे.
तुल म्हात्रे यांचं पारडं जड 
भाजपवर काहीशी मतदार यांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे तर शिवसेनेची मते आता दोन भागांमध्ये विभागली जाणार आहेत. याचा फायदा आघाडीचे शेकापचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना होऊ शकतो असा अंदाच महाविकास आघाडीच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांना वाटत असल्याने ते अधिक अतुल म्हात्रे हे गावोगावी जाऊन गाठीभेटी घेत आघाडी घेत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading