PEN न्यूज ऑनलाइन टीम :
पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३१ डिसेंबर व नववर्ष स्वागताच्या अनुषंगाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्यात आल्या. मागील तीन दिवसांपासून पेण शहरातील ४ महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. यामध्ये बोरगाव, खोपोली बायपास, नगरपालिका नाका आणि जुना पेट्रोल पंप या ठिकाणांचा समावेश होता.
या नाकाबंदीदरम्यान, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४२२ वाहनांवर तसेच दारूविक्रीसंदर्भातील केसेस करण्यात आल्या. या माध्यमातून सुमारे ३,४०,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलीस कर्मचारी, आणि वाहतूक अंमलदारांनी प्रभावीपणे पार पाडली. या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे.