पेण :
पेण पोलीस ठाण्यातील हद्दीत असलेल्या खरबाची वाडी येथे महिला फिर्यादी यांचेकडे पाहुणी म्हणुन आलेल्या १७ वर्षीय मुलगी रा.कळंब ठाकुरवाडी, ता.पाली हिला फिर्यादी यांच्या रखवालीतुन बेपत्ता झाली असून पेण पोलीस ठाण्यात २ अनोळखी इसमानी संगनमताने फुस लावून पळवून नेल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शना खाली अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रतिक पोकळे हे करीत आहेत.