रायगड ( अमुलकुमार जैन ) :
गेले कित्येक दिवसांपासून पेण तालुक्यात चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याची चर्च्या नाक्या-नाक्यावर दबक्या आवाजात ऐकायला मिळते. त्यात परिसरातील भंगारवाले कुठेही कमी नसल्याचे दिसते. यामध्ये प्रामुख्याने परप्रांतीयांचं प्रमाण अधिक असल्याचे समजते, मग अश्या या चोरांना नक्की वरदहस्त कोणाचा हा मोठा प्रश्न निर्माण होतो. याचाच प्रत्यय असा की, डोलवी येथील जे.एस.डब्ल्यु कंपनीमधील दहा लाख रुपये किमतीच्या मालाचा अपहार ज्योती स्टयन्सपोर्ट मधील टय्ेलर क्रं एम.एच.46 बी.एम.6589 यावरील चालकाने केले असल्याबाबतची तक्रार पंकजकुमार बदरीप्रसाद अग्रवाल (वय ४१ व्यवसाय नोकरी,जे.एस.डब्ल्यु-डेपाटी जनरल मॅनेजर सध्या रा अॅक्ओन टावर, सेक्टर २०, प्लॉट नं.९, खारघर नवी मुंबई) यांनी दादर सागरी पोलीस ठाण्यात केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेण तालुक्यातील मौजे जिते येथील आकाश दीप हॉटेल च्यामागील बाजूस डोलवी येथील जे.एस.डब्ल्यु कंपनी येथुन टी.एम.टी.स्टील बार असा माल विविध कंपन्याना सप्लाय करण्यासाठी आरोपी ज्योती स्टयन्सपोर्ट मधील टय्ेलर क्रं एम.एच.46 बी.एम.6589 यावरील आरोपि चालक व ईतर काही ट्रेलर वाहन चालकांनी सदरचा पुर्ण माल विविध कंपन्याना न पुरविता त्यांतील अंदाजे एकूण 10 लाख रुपये किमतीचा 15 ते 20 टन मालाचा अपहार करुन ठेवला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
याबाबत दादर (सागरी) पोलीस ठाणे येथे गु.र.नं.106/2024, भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 316(3),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणे हे करीत आहेत.
—————————————————–