पेण तालुक्यात सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर; ६४ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चित

पेण तालुक्यात सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर; ६४ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चित
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत दि. २२ एप्रिल रोजी पी.एस.एम. एस. स्कूल पेणच्या सभागृहात पार पडली. प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या हस्ते ही सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी तालुक्यातील नागरिक, माजी सरपंच, राजकीय पदाधिकारी, महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणुका काही महिन्यांसाठी लांबणीवर गेल्याने अनेक ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेमार्फत कारभार सुरू होता. मात्र, आता सरपंच आरक्षण निश्चित झाल्याने लवकरच निवडणुकांच्या हालचाली सुरू होतील, अशी शक्यता आहे.
🔹 ठळक तपशील:
  • अनुसूचित जाती आरक्षित जागा: १ (गागोदे खुर्द)
  • नुसूचित जमाती आरक्षित जागा: महिला – ७ (कळवे, मसद बुद्रुक, सोनखार, आमटेम, हमरापूर, अंतोरे, जिर्णे), खुला – ७ (काळेश्री, कणे, दूरशेत, वढाव, वाशी, जीते, जोहे)
  • नागरिक मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षित जागा: महिला – ९ (शिर्की, रावे, वरेडी, कांदळे, मळेघर, रोडे, झोतीरपाडा, वरवणे, निधवली), खुला – ८ (दिव, कासू, खरोशी, वडखळ, बेणसे, कुहिरे, आंबेघर, शेडाशी)
  • सर्वसाधारण आरक्षित जागा :  महिला – १६ (खारपाले, डोलवी, कोलेटी, पाटणोली, कोप्रोली, उंबर्डे, शिहू, बेलवडे बुद्रुक, कामार्ली, जावळी, सावरसई, वाक्रुळ, महलमी-या डोंगर, करोटी, वाशीविली, वरप), खुला – १६ (बोर्झे, दादर, कोपर, बोरी, काराव, मुंढाणी, आंबिवली, निगडे, दुश्मी, बळवली, तरणखोप, वरसई, बोरगाव, करंबेली छत्तीशी, पाबळ, सापोली)
  • अनुसूचित जाती आरक्षित जागा – १
    अनुसूचित जमाती आरक्षित जागा – महिला ७, खुला ७ एकूण १४
     ना. मा. प्र. आरक्षित जागा – महिला ९, खुला ८ – एकूण १७
       सर्वसाधारण आरक्षित जागा – महिला १६, खुला १६ , एकूण ३२
         एकूण ग्राम पंचायत – ६४
या कार्यक्रमात काही आरक्षण चिठ्ठ्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते उडवून जाहीर करण्यात आल्या, ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्सुकता आणि पारदर्शकतेची भावना निर्माण झाली.

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading