पेण तालुक्यात डिझेल, भंगार व आँईल माफीयांचा हैदोस सुरू असून दिवसाढवळ्या सिमेंट, डिझेल, आँईल व लोखंडी सळईच्या चोरीच्या मालाची तस्करी भंगारवाले राजरोसपणे करीत आहेत.
मुंबई- गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील जिते गावाजवळ असणाऱ्या आकाशदीप हॉटेलच्या पाठीमागे परप्रांतीयांनी अनाधिकृतपणे भंगारचा अड्डा उभारला आहे. या ठिकाणी कंपन्यांचा चोराटी माल घेतला जातो.
रायगड जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनाधिकृतपणे भंगारवाल्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले. त्यातच जेएसडब्ल्यू कंपनी डोलवी येथून टीएमटी स्टील बार, सिमेंट ची वाहतूक करताना चोरी करण्यात येते. तसेच जलवाहतूक करणाऱ्या मोठ्या बार्जेस (मालवाहतूक बोट) मधून डिझेल व ऑइल ची चोरी करण्यात येते. सदर चोरीचा माल विविध ठिकाणी असलेले भंगारवाले विकत घेतात व तो काळ्या बाजारात विकतात.
डोलवी येथील जे एस डब्ल्यू कंपनीतून विविध कंपन्याना लोखंडी सळईचा माल विकला जातो. सदरचा माल ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मार्फत कंपन्यांना पाठवण्यात येतो.
ज्योती स्ट्रान्सपोर्ट मधील ट्रेलर एमएच ४६. बीएम ६५८९ वरील चालक व ईतर काही ट्रेलर चालकांनी सदरचा पूर्ण माल विविध कंपन्याना न पुरविता सुमारे १५ ते २० टन मालाची चोरी करून तो जिते येथील आकाशदीप हॉटेलच्या पाठीमागे मोकळ्या जागीत अनाधिकृतपणे उभारलेल्या भंगारवाल्यांकडे विकल्याची माहिती कंपनीचे जनरल मॅनेजर पंकजकुमार अग्रवाल यांनी दादर सागरी पोलीस स्टेशनला दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राह्मणे यांनी पथकासह भंगारवाल्यांकडे धाड टाकुन जेएसडब्ल्यू कंपनीचा चोरी केलेला सुमारे दहा लाख रुपयांचा माल जप्त केला.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.