पेण तालुक्यातील वाक्रुळ शाळेचा लिपिक संदीप गोळे दोन हजाराची लाच घेतांना ACB च्या जाळ्यात

Acb Arrest Gole

अलिबाग ( अमुल कुमार जैन ) :

तक्रारदार शिक्षकाची वैद्यकीय बीले मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच घेताना वेतन व भविष्य निर्वाह पथकाचा कर्मचारी संदीप शामराव गोळे यास रायगड अँटी करपशन विभागाने रंगे हाथ पकडले.
तक्रारदार हे शिक्षक आहेत. आरोपी संदीप गोळे पेण जवळील वाक्रुळ शाळेमध्ये लिपिक म्हणून काम करत असून त्याची तात्पुरती नेमणूक वेतन व भविष्य निर्वाह पथकामध्ये करण्यात आली होती.
तक्रारदार शिक्षक यांचे पूर्वी मंजूर केलेले वैद्यकीय बिल अदा केल्याच्या मोबदल्यात दीड हजार रुपये व फेब्रुवारी २०२२ या महिन्याचे थकीत वेतन बिल मंजुरी करण्याकरिता पाचशे अशी एकूण दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी आरोपीने केली होती.
दरम्यान तक्रारदार यांनी रायगड अँटी करपशन विभागाकडे तक्रार केली होती. रायगड अँटी करपशनचे उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांनी सापळा रचून आरोपीला लाच स्वीकारतान रंगेहात पकडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading