पेण तहसिलदारांनी घेतला मान्सूनपूर्व  कामांचा आढावा 

pen-tahasil
PEN न्यूज ऑनलाइन टीम : पेणच्या तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी मान्सूनपूर्व तयारीसाठी तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय प्रमुखांची बैठक पेण तहसिल कार्यालयात घेऊन मान्सून पूर्व कामांच्या तयारीचा आढावा घेतला.
 यावेळी तालुक्यातील दरड प्रवण, पूरप्रवण, धरण क्षेत्र, तलाव, धबधबे या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच तालुका आरोग्य विभागास पावसाळयात हिवताप, लेप्टो स्पायरस व इतर आजार उदभवल्यास औषधांचा साठा तयार  ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व विभाग प्रमुखांना आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, नियंत्रण कक्ष स्थापन करणेबाबत सुचना देण्यात आली.
 पेण नगरपरिषद यांच्याकडील आपत्ती बाबत असणारे साहित्य सुस्थितीत ठेवणे, नगरपालिका यांना मान्सून पूर्व साफसफाई, गटारे साफ करणे आणि पावसाळयापूर्वी रोगप्रतिबंधक फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गटविकास अधिकारी पेण, मुख्याधिकारी, नगरपरिषद पेण आणि उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पेण तालुक्यातील पुलांची पाहाणी करुन पुल सुस्थितीत आहेत अगर कसे? याबाबत पाहाणी करुन अहवाल सादर करण्यास सांगितले.
तालुक्यात वेगवेगळया येणाऱ्या आपत्ती विचारात घेऊन आपत्तीपूर्व, आपत्ती दरम्यान व आपत्ती पश्चात काय करावे व काय करु नये याविषयी प्रत्येक गावात जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. सर्व विभागाने कार्यालयात नोडल अधिकारी यांची नेमणूक करुन त्याची माहिती नियंत्रण कक्षात सादर करावी.  आपत्ती घडल्यास पेण तहसिल कार्यालयात रात्रंदिवस स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाला तात्काळ कळविण्याचे  आदेश देण्यात आले. सर्व विभाग प्रमुखांनी विनापरवानगी मुख्यालय सोडू नये, भ्रमणध्वनी कायम सुरु ठेवावे आणि तालुक्यात उद्भवणऱ्या संभाव्य आपत्तीस तात्काळ प्रदिसाद देण्याचे निर्देश दिले.
सदर बैठकीस तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, बापूसाहेब पोळ गटविकास अधिकारी पेण, जिवन पाटील मुख्याधिकारी, नगरपरिषद पेण, कृष्णदेव सुरवसे तालुका कृषि अधिकारी, देवेंद्र पोळ पेण पोलिस निरिक्षक पेण, नारनवर वडखळ पोलिस निरिक्षक, दादर सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरिश्चंद्र बर्वे, नागोठणे पोलीस निरीक्षक, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पेण, तसेच इतर सर्व कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.
nca1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading