पेण शहरात आज दुपारी अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक सोसायट्यांचे पत्रे हवेत उडाले, तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या मोठमोठ्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. यामुळे काही भागांत वाहतूक विस्कळीत झाली.
या अचानक बदललेल्या हवामानामुळे अनेक घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्यामुळे काही वेळासाठी वीज सेवा बंद ठेवावी लागली. तरीही गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या पेणकरांना या पावसामुळे थोडासा गारव्याचा आणि दिलासादायक अनुभव मिळाला.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, विशेषतः जुन्या इमारतींमधील रहिवाशांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवर्जून सांगण्यात आले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.