पेणमध्ये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर तर्फे विनामूल्य प्रश्नोत्तरे व मार्गदर्शन शिबिराचं आयोजन

पेणमध्ये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर तर्फे विनामूल्य प्रश्नोत्तरे व मार्गदर्शन शिबिराचं आयोजन

PEN न्यूज ऑनलाइन टीम  :
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर तसेच श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित यांच्या तर्फे दिनांक २० ऑक्टोबर रोजी पेण येथे विनामूल्य प्रश्नोत्तरे व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 
शिबिरात विविध समस्यांवर मिळणार मार्गदर्शन
नागरिक ग्राम अभियानांतर्गत आयोजित या शिबिरात परमपूज्य मोरेदादा आणि परमपूज्य गुरुमाऊली यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शिबिरामध्ये खालील विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे:
  • कुटुंबातील अशांतता, वादविवाद व कोर्टकचेरी संबंधित समस्या
  • मुलांच्या हट्टीपणा व शिक्षणातील अडचणी
  • नोकरी व विवाहातील अडथळे
  • संतती प्राप्तीसंबंधी समस्या
  • वास्तुदोष व घराची वास्तुशास्त्रानुसार रचना (विना तोडफोड उपाय)
  • व्यवसायातील अडचणी
  • विविध आजार व असाध्य रोगांसाठी मार्गदर्शन
  • कर्जबाजारीपणा व आर्थिक अडचणी
  • ग्रहबाधा आणि त्यावरील उपाय
  • पितृदोषाचे लक्षणे व उपाय
  • कुलदैवताचे लक्षणे व त्यासंबंधित उपाय
  • बाल संस्कार, शिशु संस्कार व पालकत्व यावर मार्गदर्शन
शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनी आपली जन्मकुंडली आणि घराचा नकाशा सोबत आणणे आवश्यक आहे. या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
77 208 45 432 / 73 50 95 49 39 / 91 58 72 00 80 / 96 63 64 89 57
सदरील हे शिबिर श्री रामेश्वर मंदिर, चावडी नाका, हनुमान टिपेचा मारुती देवस्थान येथे सकाळी १०:३० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत होणार आहे.
या उपक्रमामुळे पेणमधील नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading