पेणच्या कन्या व नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मतदार जनजागृती कार्यक्रम

Matadan Jan Jagruti
पेण : ३२ रायगड लोकसभा मतदार संघातील १९१ पेण विधानसभा मतदारसंघांमध्ये सहायक निवडणूक अधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी शेजाळ , तहसीलदार पेण व प्रसाद कालेकर ,नायब तहसिलदार , पेण यांच्या निर्देशानुसार पेण तालुका स्वीप पथकाच्या मदतीने दि. ८ एप्रिल रोजी कन्या शाळा, पेण नगरपरिषद शाळा क्र ३ ,पेण येथील शिक्षक, मुख्याध्यापक श्रीमती रंजना म्हात्रे यांच्यासमवेत विद्यार्थ्यांना मतदान जनजागृती बाबत माहिती देण्यात आली.
विनायक पवार यांनी मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले व आपल्या आई बाबांना मतदानाच्या दिवशी सुट्टीवर न जाता व सर्व कामे बाजूला ठेऊन प्रथम मतदान करण्याचा आग्रह करावा असे सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांना संकल्प पत्र वाटप करण्यात आले सदर संकल्प पत्र विद्यार्थ्यांनी आपल्या आई ,वडील व इतर नातेवाईकांना वाचून दाखवून त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले.
पेण निवडणूक शाखा , स्वीप पथकामधील विनायक पवार , प्रवीण बैकर आणि मिलिंद महांगडे यांनी सदर कार्यक्रम घेऊन मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले.

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading