पॅथलॉजी चाचणी दरात तफावत कमी होणार कधी ?

Lab

पनवेल:
वैद्यकीय क्षेत्रात रोगांचा निदान करण्याकरिता पॅथॉलॉजी तपासण्यांचा महत्वाचा वाटा असतो. त्यातच आता वाढत असलेल्या मेडिको लीगल केसेस मुळे डॉक्टरमंडळी एखादा आजार असल्याचे प्रस्थापित करण्याकरता मेडिकल टेस्ट करून, पॅथॉलॉजी अहवाल हा लिखित स्वरूपात त्यांच्या निदानाला बळकटी देतात. त्याचप्रमाणे, हेल्थ इन्शुरन्स करता सुद्धा चाचण्यांद्वारे एखादा आजार प्रस्थापित करण्याकरता पॅथॉलॉजी अहवालाचा उपयुक्त टूल म्हणून मानला जातो. मात्र पॅथॉलॉजी लॅब्स यांचे मात्र चाचणी दरात खूप मोठी तफावत अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
साधारण उदाहरण द्यायचे तर शासकीय रुग्णालयामध्ये पी पी तत्वावर कार्यरत असलेल्या प्रायव्हेट लॅबस, रुग्णांकडून सीबीसी करता फक्त 110 रुपये जर घेत असतील, तर तीच टेस्ट एका नामांकित ब्रँडच्या पॅथॉलॉजी लॅब मध्ये साडेतीनशे रुपये पर्यंत दर आकारला जातो. थायरोकेअर,मेट्रोपोलीस,लुपीन,टाटा वन एमजी आदी नामांकित कंपन्या पॅथॉलॉजी क्षेत्रात आपले जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारित आहेत.
पनवेल ,नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात तफावत 
पनवेल,नवी मुंबई क्षेत्रातील सर्व पॅथॉलॉजी लॅब्स सर्वे केल्यानंतर असं पाहण्यात आलंय की प्रत्येक लॅबची चाचणी दर पूर्णपणे वेगळे आहेत. त्यातच आता नवीन फॅड उदयाला आलेला आहे आणि ते म्हणजे कम्प्लीट बॉडी चेक अप. मोठ्या नावाजलेल्या पॅथॉलॉजी लॅब कंपन्या विविध प्रकारचे पॅकेज ग्राहकांना उपलब्ध करून देत आहेत.हे दर सर्वसामान्यांना परवडत नाहीत.
पॅथॉलॉजी लॅब दरात येवडी तफावत का असते?
पॅथॉलॉजी सॅम्पल पिक अप आणि ड्रॉप करण्याकरता, किमान 15000 पगारावरती लोकांची नेमणूक करायला लागते. त्याचप्रमाणे त्यांना येण्या-जाण्याकरता पेट्रोलचा भाडं दहा रुपये किलोमीटरच्या भावाने द्यायला लागते. तसंच विविध हॉस्पिटलमध्ये आपल्या पॅथॉलॉजी लॅबच्या मार्केटिंग करण्याकरता मार्केटिंग टीम ही प्रस्थापित करायला लागते. मार्केटिंग टीमला किमान महिन्याचा खर्च 50 हजार इतका असून,त्यातच जर ती पॅथॉलॉजी लॅब एका भाड्याच्या कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये असेल तर ते भरभक्कम भाडं भरण्याकरता हे सर्व खर्च पॅथॉलॉजी टेस्टच्या चाचण्यांमधून आकारावे लागत आहे. परिणामी प्रायव्हेट क्षेत्रात पॅथॉलॉजी लॅब्स च्या दर मोठ्या प्रमाणात रुग्णांकडून वसूल करण्यात येतो.
————————————————
माफक दरात रक्त चाचण्या होणे गरजेचे आहे. विश्वसनीय अहवाल, आणि चाचणी दरात थेट 30 ते 40 टक्के सूट देऊन, नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही करतो.आम्हाला हे शक्य आहे, तर इतर लॅब देखील याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ शकतात. रुग्णांच्या सोयीसाठी सकाळी 8 ते रात्री 9 वाजे पर्यंत, दूरध्वनी क्रमांक 9372212859 हेल्प लाईन सुरु करण्यात आली आहे..
…मंगेश रानवडे (संस्थापक ऐरोहेड लॅब्स,पनवेल )
—————————————————-
आर्थिक लुट होत असल्यास पालिकेकडे तक्रार करा, 
रुग्णांची आर्थिक लुट होत असल्यास पालिकेकडे तक्रार केल्यास आम्ही निश्चितच अशा लॅबवर कारवाई करू
…डॉ आनंद गोसावी (मुख्य वैद्यकीय अधिकारी,पनवेल महानगरपालिका )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading