पॅडमॅन आकाश गोपाळची ‘वीआरमोर’द्वारे महिलांसाठी आरोग्यवर्धक संधी

पॅडमॅन आकाश गोपाळची 'वीआरमोर'द्वारे महिलांसाठी आरोग्यवर्धक संधी
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
तालुक्यातील पळचिल गावातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 10वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सीबीएससीची 12वीची परिक्षा दिल्यानंतर पुन्हा पोलादपूरच्या सुंदरराव मोरे महाविद्यालयामध्ये पदवीचे शिक्षण घेतलेला आकाश धनराज गोपाळ या विद्यार्थ्याची आकाशझेप गेल्या काही वर्षांमध्ये अखंड पोलादपूरवासियांना अभिमानास्पद वाटू लागली आहे. 2019 मध्ये ‘वीआरमोर’ या महिलांसाठी सॅनिटरी पॅडस् च्या उत्पादनासाठी महिलांना एकत्र करून आकाशने सुरू केलेल्या व्यवसायाला अल्पावधीतच कोरोना लॉकडाऊनचा फटका बसण्याची चिन्हे दिसून आली.
मात्र, या लॉकडाऊनच्या काळात महिलांना सॅनिटरी पॅड उपलब्ध होत नसल्याने आकाशने समाजसेवा म्हणून महिलांना पॅड उपलब्ध करून दिले. आता सुमारे पाच वर्षांच्या कालावधीमध्ये आकाशच्या कल्पकतेमुळे महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरामध्ये ‘वीआरमोर’ या सॅनिटरी पॅडस् च्या उत्पादनाची डिस्ट्रीब्युटरशिप सुरू करून महिलांना निर्मितीपासून विक्रीपर्यत सहभागी करण्यात आले आहे.
सध्याच्या धावपळीच्या युगात महिलांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यातील दोन महत्त्वाचे प्रश्न म्हणजे महिलांचे आरोग्य आणि महिलांचा बेरोजगारीचा प्रश्न. पण या विषयात प्रत्येकाला वेळेवर पुरेसे मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेक महिलांमध्ये कुवत आणि क्षमता असूनही त्या आपले कर्तृत्व सिध्द करण्यास कमी पडतात आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन महिलांच्या या दोन्ही समस्या दूर करण्यासाठी वीआरमोर सोल्युशन कंपनीचे सी.एम.डी. विकास गोपाळ आणि एम.डी.प्रिया कड यांनी वीआरमोर नावाची संस्था स्थापन करून महिलांना संघटित केले.
खऱ्या अर्थाने विश्ववंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहिली. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी माता भगिनीचा जसा आदर केला. महिलेला सन्मान दिला. महात्मा फुले आणि सावित्रीबाईनी स्त्री शिक्षणासाठी जीवाचे रान केले तसेच कार्य खऱ्या अर्थाने या व्यवसायातून गोपाळ करीत आहेत. शहरापासून खेडेगावातील वाडी, वस्तीपर्यंतच्या शेवटच्या महिलेला निरोगी व सुदृढआरोग्य मिळण्यासाठी आरोग्य विषयक समस्यांचा निपटारा करण्याकरता संपूर्ण देशभरात महिलांमध्ये जनजागृती चे काम करीत असून  एक लाख प्लस महिलांना स्वत:च्या रोजगारातून आर्थिक उत्पन्नाची हमी मिळवून दिला तर निरोगी आरोग्यासाठी वीस लाखाच्या वरती दरमहा वापरकर्ते आहेत. गर्भाशयाचे आजार, कर्करोगाविषयी उत्तम गुणवत्तेचे फूड सप्लीमेंट आणून भविष्यात कर्करोगाचे समुळ उच्चाटन व मधुमेहाचे समुळ उच्चाटनासाठी काम करणार असल्याचे महाराष्ट्राचे पॅडमन विकास गोपाळ यांनी सांगितले.
नाशिकमधील जवळपास 30हजार महिला वापरकर्ता असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, त्यामुळे पाथर्डी फाटा येथे सुरू असलेले कार्यालय नासिकमधील मध्यवर्ती ठिकाण असलेले द्वारका सर्कलजवळ पखाल रोडवर एनडीसीसी बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयाशेजारी प्रशस्त अशा सर्व सोयीसुविधांनी युक्त कार्यालयाचा शुभारंभ प्रख्यात शास्त्रज्ञ धनंजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर उद्धाटन सी.एम.डी. विकास गोपाळ, प्रिया कड तसेच संदीप भालेकर, दिनेश शिंदे यांच्या शुभहस्ते मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरूवारी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत दिमाखदार सोहळयात झाले.      
यावेळी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून मान्यवर महिला माता-भगिनी  शेकडो च्या संख्येने उपस्थित होत्या. प्रत्येकाचे स्वप्न आरोग्य आर्थिक स्वायत्तता व इच्छा यांची पूर्तता व मार्गदर्शन करण्यासाठी नासिक येथील मध्यवर्ती कार्यालय कटिबध्द असल्याचे प्रतिपादन यावेळी  दिनेश शिंदे यांनी केले आहे. यावेळी गोपाल भगत, वैशाली भगत, जयश्री बोरसे, अनिता अहिरराव, धनश्री पाटील, स्नेहल सोनवणे, नेहा सोनवणे, नितीन पगार, सुरेश हिरे, आदि उपस्थित होते तर ॠग्वेद एंटरप्रायजेस यांनी सर्वोकृष्ट सेवा दिली.
विकास गोपाळ यांना पोलादपूर तालुक्यातून राज्यातील शहरी भागामध्ये गेल्यानंतर यशस्वी उद्योजक पुरस्कार सिनेअभिनेत्री मानसी नाईक यांच्याहस्ते मिळाला. राजभवनामध्ये भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राचा कोविड योध्दा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अहमदनगर येथे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते शिवछत्रपती आदर्श पॅडमॅन पुरस्कार प्रदान करण्यात आला. रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशनतर्फे महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला.
दैनिक पुढारीतर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते यूथ आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमृता फडणवीस यांच्याहस्ते आदर्श युवा उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला. आता विकास गोपाळ याच्याकडे राज्यातील महिलाभगिनींच्या सेवेतील आदर्श तरूण म्हणून पाहिले जात असून  ‘वीआरमोर’ या सॅनिटरी पॅडस् च्या उत्पादनाद्वारे ते घराघरात आणि प्रत्येक कार्यालयात वकाअग वूमन आणि स्कूल कॉलेज गर्लसपर्यंत पोहोचले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading