पुरातन वास्तूंचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने संसदेच्या अधिवेशनामध्ये याबाबत निश्चितपणे सभागृहात चर्चा करण्यात येईल असे स्पष्ट उद्गार धाराशिव लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओम राजे निंबाळकर यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्या दरम्यान रायगडावर स्पष्ट केल.
किल्ले रायगडावरील सहा जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या कामांबाबत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना विचारले असता त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की निश्चितपणे पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या ज्या वास्तू आहेत, त्या ठिकाणी असंख्य अडचणी अनेक राज्य सरकार यांना येतात, मी ज्यावेळी खासदार म्हणून शपथ घेईल त्यावेळेला निश्चितपणे पुरातत्त्व विभाग असेल आणि राज्य सरकार असेल.
या दोघांमध्ये चांगल्या पद्धतीचा समन्वय तयार होऊन त्या सर्व पुरातत्त्व वास्तूंचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने व कुठल्याही प्रकारचा कागदोपत्री अडचणी व दप्तर दिरंगाई होणार नाही त्या दृष्टीने कायद्यामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करेन असे उद्गार धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रायगड येथे बोलताना स्पष्ट केले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.