कोलाड (श्याम लोखंडे ) :
रोहा तालुक्यातील पुई गावचे शेकापचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धोंडू रामचंद्र सानप यांचे सोमवार दि. २४ /२/२०२५ रोजी वृद्धपाकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ९५ वर्षाचे होते.ते प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वाना परिचित होते.कोलाड आणि खांब परिसरात ते शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचित त्यांचा सांभाळ त्यांचे पुतणे अनंत रामु सानप यांनी केला.धोंडू रामचंद्र सानप हे शेकापचे जेष्ठ कार्यकर्ते होते तसेच ते काही काळ ग्रामपंचायत सदस्य देखील होते. सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असलेले धोंडू सानप यांच्या निधनाने सानप परिवारावर दुःखाचे डोंगर तर पुई गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य नागरिक, नातेवाईक तसेच समस्त पुई ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पाच पुतणे,दहा पुतण्या,सुना,नातवंडे, पतवंडे व मोठा सानप परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी बुधवार दि.५/३/२०२५ तर त्यांचे उत्तरकार्य विधी शनिवार दि.८/३/२०२५ रोजी पुई येथील त्यांच्या राहत्या घरी हभप आंबेतकर महाराज यांच्या सुश्राव्य प्रवचनरुपी सेवेतून पुष्पांजली अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहून होणार आहेत.